Join us  

सारा अली खानसोबत खरंच अफेअर होतं? कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 4:29 PM

Kartik Aaryan On Linkup with Sara Ali Khan: सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता कार्तिकने सारा अली खानसोबतच्या रिलेशनशिपवर पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे.

Kartik Aaryan On Linkup with Sara Ali Khan: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व सारा अली खान  (Sara Ali Khan) यांच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा होती. खरं तर बॉलिवूड डेब्यूच्या आधीपासूनच साराला कार्तिक आवडायचा. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये कार्तिकवर क्रश असल्याचं सारानं अगदी खुल्लमखुल्ला सांगितलं होतं. यानंतर आपल्या याच क्रशसोबत ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात काम करण्याची संधी साराला मिळाली आणि शूटींगदरम्यान दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येणं सुरू झालं. या काळात दोघंही अनेकदा एकत्र दिसले. पण ही लव्हस्टोरी फार काळ चालली नाही. ‘लव्ह आज कल 2’चं शूटींग संपलं, तसं दोघांचं नातं सुद्धा संपलं. दोघांचेही मार्ग वेगळे झालेत. अगदी सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. यादरम्यान सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता कार्तिकने सारा अली खानसोबतच्या रिलेशनशिपवर पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत कार्तिक यावर बोलला.

काय म्हणाला कार्तिककार्तिक व साराच्या अफेअरच्या चर्चा ‘लव्ह आज कल 2’च्या प्रमोशनचा फंडा होता, असं मानलं गेलं. ताज्या मुलाखतीत कार्तिकला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुझ्या आणि साराच्या अफेअरच्या बातम्या प्रमोशनल फंडा होता का? असा प्रश्न त्याला केला गेला. यावर त्यानं हैराण करणारं उत्तर दिलं. ‘असं अजिबात नाही. काहीही प्रमोशनल नव्हतं. मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू? आम्ही पण माणसं आहोत आणि प्रत्येक गोष्ट प्रमोशन नसते. या मुद्यावर मी फक्त एवढंच म्हणेल,’असं कार्तिक म्हणाला.

आईमुळे झालं ब्रेकअप?सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीत साराची मॉम अमृता सिंग ‘विलन’ ठरल्याच्या चर्चाही जोरात होत्या. रिपोर्टनुसार, आपल्या लेकीनं करिअरवर फोकस करावा, तिने कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नये, अशी अमृताची इच्छा होती. आईच्या याच इच्छेखातर म्हणा वा दबावापोटी म्हणा साराने रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्तिकआधी सुशांत सिंग राजपूतसोबतही साराचं नाव जोडलं गेलं होतं.

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खानबॉलिवूड