बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील वाद कोणापासून लपून राहिलेला नाही. 'दोस्ताना 2' दरम्यान झालेल्या या दोघांमधील मतभेदाने बरीच चर्चा केली होती. पण कार्तिक किंवा करण जोहर याबद्दल कधीच काही सांगितले नाही. पण आता या दोघांमधील वाद संपुष्टात आला आहे. कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर एकत्र बसून कॉफी घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
करण जोहर लवकरच त्याचा शो 'कॉफी विथ करण' घेऊन परतणार आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही हा शो OTT वर दिसणार आहे. यावेळी शोमध्ये कोणकोण हजेरी लावणारा यावर चर्चा सुरू झाली आहे. पण दरम्यान, कार्तिक करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
शोमध्ये कार्तिकसोबत कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही. रिपोर्टनुसार, कार्तिक आणि करण दोघांनी ही त्यांच्यातील मतभेद दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या एपिसोडमध्ये ते त्यांच्या भांडणाच्या बातम्यांबाबतही मोकळेपणाने बोलण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, कार्तिक आर्यन आणि करण जोहर मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका पॅनेलवर एकत्र बसलेले दिसले होते.
काय होता वाद?धर्मा प्रॉडक्शनने 2021 मध्ये 'दोस्ताना 2' पुन्हा कास्ट करण्याची घोषणा केल्यापासून कार्तिक आणि करणमधील मतभेदाबाबत अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानीसोबत 'दोस्ताना 2'मध्ये मुख्य भूमिकेसाठी कार्तिकची निवड करण्यात आली होती. मात्र, 2021 मध्ये कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.