Join us  

कार्तिक आर्यनने 'धमाका'नंतर 'या' चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 3:41 PM

कार्तिक आर्यनने नुकतीच आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट धमाकाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यानंतर आता तो लवकरच एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे शहशादा. 

अभिनेता कार्तिक आर्यनने सध्या बॅक टू बॅक विविध प्रोजेक्ट्सच्या घोषणा आणि शूटिंग शेड्यूलमध्ये अतिशय व्यस्त आहे. नुकतेच कार्तिकने आपल्या इंस्टाग्रामवर क्लॅपर फोटो शेअर करताना लिहिले की, "शहजादा सुरू" 

कार्तिक आर्यन न थांबता, अथकपणे शेड्यूलवर काम करतो आहे. तो चोवीस तास काम करतो आहे, मग ते शूटिंग असो, प्रमोशन असो किंवा लॉन्च इवेंट. कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट 'शहजादा'मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक रोहित धवनसोबत काम करतो आहे.  या चित्रपटात तो आपली 'लुका छुपी'ची सह-कलाकार कृति सेननसोबत दिसणार आहे. कार्तिक अभिनेता अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकायला सज्ज आहे. ज्याने ओरिजनल चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलु'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. २०२० मधली सर्वात मोठ्या हिट चित्रपटाला हिंदी दर्शकांसाठी पुन्हा बनवण्यात येत आहे. कार्तिकने या आधी अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमुलु'मधील गाणे 'बुट्टा बोम्मा'वर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता आणि आता, 'शहजादा'च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.

'शहजादा'  ४ नोव्हेंबर, २०२२ ला होणार प्रदर्शित 'शहजादा' चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टैग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रीमेक दमदार होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून ४ नोव्हेंबर, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.कार्तिककडे आगामी चित्रपटांची भली मोठी रांग असून 'धमाका', 'भूल भुलैया 2', अलाया एफसोबत 'फ्रेडी' यासोबतच आता 'शहजादा'चा समावेश होत आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनक्रिती सनॉन