Join us

करिना म्हणते,‘मी महत्त्वाकांक्षी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 16:35 IST

‘बेगम आॅफ पतौडी’ करिना कपूर खानची अदाच काही और आहे. निवडक चित्रपट, उत्तम भूमिका, ठाम निर्णय यांच्यामुळे तिच्या फॅन ...

‘बेगम आॅफ पतौडी’ करिना कपूर खानची अदाच काही और आहे. निवडक चित्रपट, उत्तम भूमिका, ठाम निर्णय यांच्यामुळे तिच्या फॅन फॉलोर्इंगला काही कमी नाही. ‘नवाब आॅफ पतौडी’ सैफ अली खानची पत्नी झाल्यापासून तिचे वर्चस्व वाढतच गेले. आता तर काय? खान कुटुंबियाला ती वारसदार देणार असल्याने सर्वजण प्रचंड आनंदात आहेत. सध्या गरोदर असली तरीही ती प्रसूतीनंतर काही महिन्यातच पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना बेबो म्हणते,‘ मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, ती पूर्ण केल्याशिवाय मला शांत बसवत नाही. शांत बसून संयमाने एखादी कृती करणे माझ्या स्वभावातच नाही. मी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. करिअरसंदर्भात मी प्रचंड स्वाभिमानी आहे. करिअरमध्ये कोणतीही बाब अडथळा ठरू शकते असे मला वाटत नाही. ‘गरोदरपण ’ हे देखील  माझ्या करिअरमध्ये अडसर ठरला नाही. उलट मी माझं गरोदरपण मस्त एन्जॉय करतेय. लोक कोणत्याही  गोष्टीचा एवढा बाऊ का करतात? तेच मला कळत नाही. मी काय करावं यासाठी अनेकजण मला सल्ले देत राहतात. मी सर्वांचं ऐकून शेवटी माझ्या मनाप्रमाणंच करत असते. ’(हसते)वेल, ती बेबो आहे. आपण तिचे विचार ऐकून काळजी करण्याची बिल्कुल गरज नाहीये. सैफ आहे ना! तो पाहील तिची कशी काळजी घ्यायची ते!