Join us

करिनाचा विचार करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:20 IST

शाहिद- मीराचे लग्न झाल्यानंतर शाहिदचा 'शानदार' चित्रपट प्रदर्शित झाला. पण तो काही फारसा पसंतीस उतरला नाही. त्यामुळे त्याचा आगामी ...

शाहिद- मीराचे लग्न झाल्यानंतर शाहिदचा 'शानदार' चित्रपट प्रदर्शित झाला. पण तो काही फारसा पसंतीस उतरला नाही. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट 'उडता पंजाब' कडून बर्‍याच अपेक्षा आहेत. आलियाच्या अगोदर करिनाचा विचार शाहिद करत आहे. चित्रपटासाठी कास्टिंग करायची वेळ आली त्यावेळी त्याच्या डोळयासमोर करिनाचा चेहरा आला. शाहिदने जेव्हा स्क्रिप्ट ऐकली त्यावेळी त्याला करिनाने या चित्रपटात काम करावे असे वाटले. इतर कोणीही चित्रपटात काम करण्यासाठी तयार होत नसून करिनाने काम करावे असे तो म्हणतो. तिच्याविषयी मी एक अभिनेता म्हणून खूप विचार करतो, असेही तो सांगतो.