Join us  

प्रेग्नंसी दरम्यान झिरो फिगरला मिस करतेय करिना कपूर, सैफसह शेअर केला थ्रोबॅक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 12:57 PM

दुस-यांदा करिना कपूर खान बाळाला जन्म देणार आहे. वाढलेले वजन पाहून करिनाला तिच्या झिरो फिगर असलेलेल दिवस आठवले आणि तिनेही तिचा सैफसह असलेला जुना फोटो शेअर केला होता.

बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.. झिरो फिगरसाठी  आणि सुंदर दिसण्यासाठी करिनाने केलेली मेहनतही सा-यांनाच माहिती आहे. इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. करिनाच्या चाहत्यांना वाटलं की नवाब सैफ अली खानची पत्नी झाल्यानंतर आता करिनाही नवाबी फुडकडे आकर्षित होईल मात्र असं झालं नाही. करिना तिचे मनपसंत फुड डिशच खाणे पसंत करते.

 

करिनाला साधं शुद्ध भारतीय जेवण आवडतं . यासाठी तिने एक्ट्रेस मधुबालाकडून प्रेरणा घेतली आहे. भारतीय जेवण आणि मधुबालाचं सौंदर्य याचं ताळमेळ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र करिनाला वाटतं की मधुबालांच्या काळात कोणतीही डाएट प्रक्रिया नव्हती. त्यामुळे मधुबालांच्या सौंदर्यामागचं मुख्य कारण हे अस्सल भारतीय जेवणच असल्याचं करिना सांगितले होते.

झिरो फिगरसाठी करिनाकडून इतर अभिनेत्री प्रेरणा घ्यायच्या. मात्र आता प्रेग्नंसीमध्ये करिनाचे वाढलेले वजन पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. दुस-यांदा करिना बाळाला जन्म देणार आहे. वाढलेले वजन पाहून करिनालाही तिची झिरो फिगर असलेले दिवस आठवले आणि तिनेही तिचा सैफसह असलेला जुना फोटो शेअर केला आहे. यावरुन तिच्या झिरो फिगरला ती जास्त मिस करत असल्याचे स्पष्ट होते. 

तैमुर कंटाळलाय फोटोग्राफर्सना, म्हणाला Not Allowed, पाहा हा व्हिडिओ

तैमुरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो प्रचंड चिडलेला दिसत असून फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या फोटोग्राफर्सना परवानगी नाहीये असे सुनावताना दिसत आहे. तैमुरचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओत आपल्याला करिना आणि तैमुर हे दोघे एका हॉटेलच्या आत जाताना दिसत आहे.

 

तैमुर आणि करिनाला पाहाताच तिथे उपस्थित असलेले फोटोग्राफर्स त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी तैमुर मागे वळून Not Allowed (परवानगी नाहीये) असे ओरडताना दिसत आहे. त्यावर करिना त्याचा हात पकडून त्याला आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तैमुर प्रचंड चिडलेला असल्याने तिचे देखील ऐकत नाहीये. तो पुन्हा एकदा Not Allowed असे बोलताना दिसत आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान