करिना कपूर पती सैफ अली खानसोबत सीक्रेट प्रोजेक्टवर लंडनला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 14:23 IST
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपला पती सैफ अली खानसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. करिना आणि सैफ लंडनाला रवाना ...
करिना कपूर पती सैफ अली खानसोबत सीक्रेट प्रोजेक्टवर लंडनला रवाना
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपला पती सैफ अली खानसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. करिना आणि सैफ लंडनाला रवाना झाले आहेत. मात्र यावेळी त्यांच्याबरोबर तैमूर दिसला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिना तिचा आगामी चित्रपट शेफच्या शूटिंगसाठी लंडनाला रवाना झाली आहे. याचित्रपटात करिनाचा कॅमिओ रोल आहे. शेफचा दिग्दर्शक राजा मेनन यांने या गोष्टीला नकार दिला आहे. मेमनचे म्हणणे आहे करिनाचा या चित्रपटात कोणताच रोल नाही आहे. करिनाच्या मॅनेजरने करिना अॅडच्या शूटिंगसाठी करीना लंडनाला गेली असल्याचे सांगितले आहे. एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार शेफमध्ये करिनाला कॅमिओ रोल यासाठी दिला गेला आहे की तिच्या असण्यामुळे चित्रपटाचे प्रमोशन होईल. याआधी ही सैफ अली खानचा चित्रपट हॅपी एंडिंगमध्ये ही करिनाची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. करिनाने याआधी सैफ बरोबर ओमकारा, टशन, कुर्बान, एजेंट विनोद याचित्रपटात एकत्र काम केले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. शेफ हा चित्रपट 2014मध्ये आलेल्या हॉलिवू़ड चित्रपटाचा रिमेक आहे. सैफच्या अपोजिटच्या रोलमध्ये पद्मप्रिया दिसणार आहे. 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.