Join us  

करीना कपूर खानच्या सेकेंड प्रेग्नेंसीमुळे 'वीरे दी वेडिंग २'ला लागला ब्रेक, निर्मात्यांनी केला खुलासा

By तेजल गावडे | Published: November 07, 2020 1:59 PM

सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वीरे दी वेडिंगला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळाली होती.

सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वीरे दी वेडिंगला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले होते. तसेच चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा झाली होती. वीरे दी वेडिंगनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. त्यात आता निर्मात्यांनी वीरे दी वेडिंगचा सीक्वल येणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाचे निर्माते निखिल द्विवेदीने पिपिंगमूनला सांगितले की, लवकरच वीरे दी वेडिंगच्या सीक्वलला सुरूवात करू शकतो.

वीरे दी वेडिंग २बद्दल निखिलने सांगितले की, आम्हाला वीरे दी वेडिंग २ नक्कीच बनवायचा आहे. आता आम्ही करीना दुसऱ्यांदा आई बनण्याची वाट पाहत आहोत. ती आई झाल्यानंतर आम्ही आनंदात चित्रपटाच्या सीक्वलला सुरूवात करू शकतो. ती प्रेग्नेंसीत प्रत्येक ठिकाणी प्रवास करू शकत नाही. ती आई झाल्यानंतर ती जेव्हा कामावर परतण्यासाठी तयार होईल, तेव्हा आम्ही वीरे दी वेडिंग २ला सुरूवात करू. आम्ही वीरे दी वेडिंगच्या दुसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहोत.

निर्माते निखिल द्विवेदीने वीरे दी वेडिंगचा सीक्वल येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चाहते खूप खूश आहेत.

वीरे दी वेडिंग चित्रपटाबद्दल सांगायचं तर यात चार मुलीची कथा रेखाटण्यात आली आहे. त्या समाजाची बंधने तोडून स्वतःला जे वाटते ते करण्याचा मार्ग निवडतात. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी येतात पण ते हार मानत नाहीत आणि अखेर आपला मार्ग स्वतःच बनवतात.

टॅग्स :वीरे दि वेडिंग सिनेमाकरिना कपूरस्वरा भास्करसोनम कपूर