करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) व सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा धाकटा लेक जहांगीर अली खान ( Jehangir) सध्या जाम चर्चेत आहे. जहांगीरचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर होते. नाही म्हणायला करिनाने त्याचे काही फोटो शेअर केले होते, पण या प्रत्येक फोटोत त्याचा चेहरा चतुराईने लपवला होता. पण अखेर छोट्या जहांगीरची झलक चाहत्यांना दिसलीच.होय, आजोबा रणधीर कपूर यांच्या घरी जातानाचे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सैफ अली खान व करिना हेही या फोटोत दिसत आहेत. फोटोत चिमुकला जहांगीर बाबाच्या कडेवर दिसतोय.
करिनाने यावर्षी 21 फेबु्रवारीला जहांगीरला जन्म दिला होता. तेव्हापासून करिना व सैफने जाणीवपूर्वक त्याचा चेहरा जगापासून लपवला होता. शिवाय अगदी आत्ता आत्तापर्यंत त्याच्या नावाचाही खुलासा केला नव्हता.
अगदी अलीकडे करिनाने आपल्या दुस-या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा खुलासा झाला आणि अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतले.