Join us  

गुडन्यूज! कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते करिना, आई बबिता आणि करिश्मा पोहोचल्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 12:44 PM

kareena kapoor khan is going to be admitted to the hospital anytime : हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल.

करिना कपूर कोणत्याही क्षणी दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते, रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की करीनाला कोणत्याही वेळी डेलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. तिची आई बबिताही रात्री उशिरा करिश्मा कपूरसमवेत करीनाच्या घरी आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये करिश्मा कपूर आणि बबिताशिवाय सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिमही दिसला आहे. या सर्वांनी करीना कपूरच्या घरी पोहोचल्याची बातमी आहे. 

Elle मॅक्झिन सोबत बोलताना सैफ म्हणाला, 'जेव्हा घरी न्यू बॉर्न बेबी असेल, तेव्हा काम कुणाला करावे वाटेल. आपण आपल्या मुलाला वाढताना पाहत नसाल तर, आपण चूक करत आहात. मी कामातून वेळ काढू शकतो, ही एक प्रिव्हिलेज पोझिशन आहे. 9 ते 5चे रूटीन फॉलो करण्याऐवजी मी एका अ‍ॅक्टर सारखेच जगतो.' करिना आणि सैफ यांनी ऑगस्त 2020मध्ये दुसऱ्या मुलासंदर्भात अनाउंसमेन्ट केली होती. 

हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. त्यांना एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव तैमूर आहे. तैमूर हा सोशल मीडियावर स्टार आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता. तसे पाहता, सैफ अली खानचे हे चौथे मूल असेल. यापूर्वी पहिली पत्नी अमृता सिंहकडून त्याला दोन मनलं आहेत. काही दिवसांपूर्वी सैफने पॅटरनिटी लीव्हसंदर्भातही भाष्य केले आहे.

टॅग्स :करिना कपूर