Join us  

नखरेवाली...! ड्रेस प्रेस केला नाही म्हणून स्टाफवर बरसली बेबो करिना, पाहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 5:13 PM

बाबो...बेबो...

ठळक मुद्देसध्या करिना लॉकडाऊनमुळे घरी आहे. पण लवकरच ती आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे

लॉकडाऊनमुळे करिना कपूर घरात कैद आहे. पण म्हणून बेबो करिनाच्या चर्चा कमी नाहीत. आता तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ बेबो इतके नखरे दाखवतेय की, पाहणारा दंग होईल. होय, या व्हिडीओ बेबो तिच्या स्टाफवर ओरडताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ करिना कपूरचा रेडिओ शो ‘व्हॉट वूमेन वॉन्ट 2 ’च्या सेटवरील आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला करिना तिच्या स्टाफमधील एकाला कपमध्ये कॉफी जास्त टाकण्यासाठी बोलते. आणखी एका मुलीला  तिला स्ट्रेस न देण्याविषयी सांगते. त्यानंतर कपडे नीट प्रेस न केल्याबद्दल लक्ष्मी नावाच्या एका मुलीवर डाफरताना दिसते.

 इन्स्टाग्रामवर एक फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओतील बेबोचे नखरे पाहून युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट देताना दिसत आहेत. काहींनी तिला ‘ओव्हर अ‍ॅक्टिंगचे दुकान’ म्हटले आहे तर काहींनी तिच्या या वागण्याला ‘अ‍ॅटिट्यूड’चे नाव दिले आहे. खरे तर करिनाचे नखरे कुणालाही नवे नाहीत. याआधीही तिच्या नख-यांची अशी बरीच चर्चा झाली आहे.

सध्या करिना लॉकडाऊनमुळे घरी आहे. पण लवकरच ती आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे. नुकताच तिच़्चा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमात करिना इरफान खानसोबत  पोलीस आॅफिसरच्या भूमिकेत दिसली होती.  

टॅग्स :करिना कपूर