Join us  

चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळतं यावर करिना कपूर खान म्हणते.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:46 PM

अनुष्का असो किंवा दीपिका किंवा अन्य कुणी अभिनेत्री प्रत्येकीला त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार मानधन मिळतं.

बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना शोभेची बाहुली म्हणूनच वापरले जाते. तसेच अभिनेत्यांच्या तुलनेत मानधनही फारसे समाधानकाकर दिले जात नाही. असे अनेकदा बी-टाऊनच्या अभिनेत्रींनी त्यांची मतं वेगवेळ्या व्यासपिठावर मांडली आहेत.  यांत तसेच सध्या महिलाप्रधान सिनेमांचा ट्रेंड देखील हिट ठरत आहे. महिलाप्रधान सिनेमात  कथा महिलाच पुढे नेते. त्यामुळे अभिनेत्रींना आज महत्त्व प्राप्त झाले आहे. दिवसेंदिवस खूप बदल आता चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहे.  करिना देखील  ५ ते ६ कोटी इतके मानधन सिनेमासाठी घेते.मानधनावर करिनानेदेखील लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिचे मत मांडले होते. तिने म्हटले होते की, माझ्या मते प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत आहे. 

अनुष्का असो किंवा दीपिका किंवा अन्य कुणी अभिनेत्री प्रत्येकीला त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार मानधन मिळतं. त्यात अनेकजण लेखक आणि निर्माते बनत आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलत आहे. प्रत्येकजण मानधनाच्या बाबतीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अभिनेत्री मानधनात न्याय मिळावा यासाठी आवाजही उठवत आहेत. याबाबत सवाल जवाब होत आहेत ही गोष्ट चांगलीच आहे.

तसेच बदल हे स्वतःहून घडत नसतात त्यांना आपण बदलायचे असते. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही. त्यानंतर लोक बोलू लागले की मुलं झाल्यावर तर बिल्कुलच काम मिळणार नाही. मात्र माझ्याबाबतीत उलट घडत आहे.

आजघडीला मी चित्रपट नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि तैमूरला वेळ द्यायचा आहे. चित्रपट नाकारत असले तरी माझ्याकडे आज पाच चित्रपट आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले. त्यामुळे बदल कोणी येऊन घडवेल याची वा न पाहता स्वतःनेच पुढाकर घेण्याची ही आज काळाची गरज बनली आहे. असे रोखठोक करिनाने मत मांडले होते.

  

टॅग्स :करिना कपूर