Join us  

दुसऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी करीना कपूर खान आणि सैफ अली खान शिफ्ट होणार नवीन घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 1:01 PM

दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी करीना व सैफ नवीन घरात जाणार आहेत.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच दुसऱ्यांदा आई बनणार आहे आणि दुसऱ्या बाळाला घेऊन ती खूपच उत्साही आहे. दुसऱ्या बाळाचे आगमन करीना आणि सैफ नवीन घरात करणार आहे. त्यामुळे ते दोघे लवकरच त्यांच्या खारमधील घरात राहायला जाणार आहेत. 

सध्या करीना कपूर खान आणि सैफ अली खान खारमधील फॉर्च्युन हाईट्स या इमारतीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या इमारतीच्या शेजारील इमारतीत एक घर घेतले  आहे. जे घर फॉर्च्युन हाईट्समधील घराच्या दुप्पट आहे. फॉर्च्युन हाईट्सचे शेवटचे दोन मजले हे करीना व सैफचे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नवीन घराचे काम सुरू असून आता ते पूर्ण झाले आहे. करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असे टेरेस बनविण्यात आले आहे. या घराचे सर्व काम प्रसिद्ध डिझायनर दर्शिनी शाह करत आहेत.

करीना कपूरच्या फॉर्च्युन हाईट्समधील घरात बऱ्याच आठवणी आहेत. लग्नानंतर करीना याच घरात आली होती. तसेच तैमूरचा जन्म देखील याच घरात झाला आहे. हे घर सोडण्याआधी करीनाने तिच्या खास मैत्रिणी अमृता अरोरा, मलायका अरोरा आणि बहिण करिश्मा कपूर यांच्यासोबत पार्टीदेखील केली. या पार्टीचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करत त्याला 'फॉर्च्यून मेमरीज' असे कॅप्शन दिले आहे.

करीना आठ महिन्यांची प्रेग्नेंट असून येत्या मार्च महिन्यात तिची प्रसूती होणार आहे. करीना कपूर दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. यादरम्यान तिने आपल्या कामाला ब्रेक दिलेला नाही. या दरम्यान तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे दिल्लीत शूटिंग केले होते. त्यानंतर तिने एका जाहिरातीचेही शूटिंग केले होते.  

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर