Join us  

हे काम सैफ अली खानला अजिबात आवडत नाही..., करिनाने शेअर केलं नवऱ्याचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:13 PM

Kareena kapoor, Saif Ali Khan: आताश: करिनाचा मोठा मुलगा तैमूर हाही कॅमेऱ्यांना सरावला आहे. लहानगा जेह हाही कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसतो. सैफचं प्रकरण मात्र जरा वेगळं आहे.

करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) व सैफ अली खान (Saif Ali Khan) हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. अगदी या कपलची मुलं तैमूर व जेह  (Taimur-Jeh) हे देखील तितकेच लोकप्रिय. हे तिघं दिसले रे दिसले की पापाराझींचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले जातात. मग करिना पापाराझींना जबदस्त पोझ देते. आताश: करिनाचा मोठा मुलगा तैमूर हाही कॅमेऱ्यांना सरावला आहे. लहानगा जेह हाही कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसतो. सैफचं प्रकरण मात्र जरा वेगळं आहे. होय, खुद्द करिनानेच याबाबतची एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

करीना कपूर खान सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने एक इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. यात तिने एका मॅगझिनचं कव्हरपेज शेअर केलं आहे. या पेजवर सैफबद्दल भरभरून लिहिलं आहे. ‘पतौडी नवाब, शर्मिला टागौर व नवाब मन्सूर अली खान पतौडीचा मुलगा. एक अभिनेता असलेला सैफ प्रत्येक भूमिकेत अगदी सहज फिट बसतो. सैफ अली खान कॉर्डन ब्ल्यू रॉयल आहे. त्याचं कुटुंब म्हणजे करिना व दोन्ही मुलं तैमूर व जेह पापाराझींना पाहून खूश होतात. कॅमेरा फेस करणं त्यांना आवडतं. याऊलट सैफ एक पॉवरफुल पर्सन आहे, ज्याला शांतता आवडते,’ असं या पेजवर लिहिलेलं आहे. या पेजचा फोटो शेअर करत, करिनानं त्याला कॅप्शन दिलं आहे. तू पापाराझींसमोर पोझ का देत नाही, हे आता प्रत्येकाला कळेल, असं तिनं लिहिलं आहे.

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो ओम राऊतच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमात दिसणार आहे. यात  सैफ प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमात तो रावणाची भूमिका साकारणार आहे. सैफ अली खान आणि प्रभास यांच्यासोबत या सिनेमात कृती सेनन मुख्य भूमिकेत आहे. सैफचा  विक्रम वेधा हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान