Join us

करिनाने भूमिकेसाठी कधीच केले नाही ‘टक्कल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 11:12 IST

करिना कपूर खान ही नेहमी वेगवेगळ्या भूमिकांसाठी आणि आव्हानात्मक रोल मिळवण्यासाठी धडपडत असते. टशन पासून ते की अ‍ॅण्ड का ...

करिना कपूर खान ही नेहमी वेगवेगळ्या भूमिकांसाठी आणि आव्हानात्मक रोल मिळवण्यासाठी धडपडत असते. टशन पासून ते की अ‍ॅण्ड का पर्यंत तिच्या भूमिका आव्हानात्मकच होत्या.पण, आत्तापर्यंत कधी असे झाले नाही की, तिने भूमिकेला न्याय देण्यासाठी स्वत:चे टक्कल करून घेतले. ‘लॅक्मे फॅशन वीक’ वेळी बोलताना करिना म्हणाली,‘ मी भूमिकेसाठी काहीही करेन. पण फॅशन ब्लॉग्जसाठी मी विविध प्रयोग करत असते.मेकअपमधील बदल किंवा भूमिकांमधील वेगळेपणा मी आत्तापर्यंत केला आहे. पण, कधीही माझे केस काढून टक्कल करून मी एखादी भूमिका केली नाही.’ असा एखादा चित्रपट तुला मिळाल्यास तू काय करशील? असे तिला विचारण्यात आले असता ती म्हणाली,‘ मी अद्याप विचार केलेला नाही’