Join us  

मुलाला भेटण्यासाठी घरातून पळून गेली होती करिना कपूर, बेबोने स्वत: सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 10:33 AM

आईने थेट केली होती बोर्डिंग स्कूलमध्ये रवानगी

ठळक मुद्देकरिना लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.

करिना कपूर म्हणजे एक बिनधास्त अभिनेत्री. आपल्या अटींवर जगणारी बेबो सुमारे दोन दशकांपासून इंडस्ट्रीत आहे आणि काळासोबत ती अधिकाधिक प्रगल्भ झालीत. अर्थात शालेय जीवनात बेबो कमालीची खोडकर होती. इतकी की, तिच्या या खोडकर स्वभावाला वैतागून तिची आई बबीताने तिला डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये भरती केले होते.

अलीकडे स्वत: करिनाने बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर करिना किती खोडकर होती, याचा अंदाज तुम्हाला येईल. एकदा तर एका मुलाला भेटण्याच्या नादात बेबो अडचणीत आली होती.हा नेमका किस्सा काय होता, हे करिनाने सांगितले. तिने सांगितले, लहानपणापासून माझी मोठी बहीण करिश्मा जे करायची, तेच मी करायचे. करिश्माला तिच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याची परवानगी होती. पण मला मित्रांसोबत जाण्यास आईने मनाई केली होती. याचा मला खूप राग यायचा. त्या दिवसांत मला एक मुलगा आवडला होता आणि त्याला मला भेटायला जायचे होते. आईने साहजिकच मला नकार दिला.

मी 14-15 वर्षांचे होते आणि तो मुलगा मला मनापासून आवडला होता. आईला हे आवडले नव्हते. ती फोन तिच्या रूममध्ये लॉक करून ठेवायची. पण मला त्या मुलाला भेटायचे होते. मी संधी साधली. आई डिनरला गेली होती. मी चाकूने आईच्या रूमचे कुलूप तोडले आणि फोन घेऊन प्लान बनवला. प्लान बनवून मी घरातून पळून गेले. आईला जेव्हा हे कळले,तेव्हा तिने माझे काहीही ऐकले नाही. यानंतर मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले गेले. घरातून पळून जाणे चूक होते, हे आत्ता कळते. पण तेव्हा मला फक्त त्या मुलाला भेटायचे होते आणि दुसरा कोणताही विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हता.

करिनाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा आईचा निर्णय किती योग्य होता, हे आता खुद्द बेबोही मान्य करेल. करिना लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.

टॅग्स :करिना कपूर