करणला हवी कंगना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 11:06 IST
काय हेडिंग वाचून दचकलात ! करण म्हणजे आपला करण जोहर हो. त्याला कंगना हवीयं. आता भलता-सलता अर्थ काढू नका. ...
करणला हवी कंगना...
काय हेडिंग वाचून दचकलात ! करण म्हणजे आपला करण जोहर हो. त्याला कंगना हवीयं. आता भलता-सलता अर्थ काढू नका. कंगनाला घेऊन करणला एक सिनेमा काढायचायं. विशेष म्हणजे कंगनासोबत काम करायला तो अधीर झाला आहे. आता मी कंगनासोबत काम करण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही,असे करण म्हणाला.‘शुद्धी’ या करणच्या बहुप्रतीक्षीत चित्रपटाचे चित्रीकरण येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होत आहे. वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच करण एक नवा चेहरा लॉन्च करणार असल्याचीही चर्चा आहे.