करण म्हणतो, माझ्या व काजोलच्या नात्यात आता काहीही उरलेले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 11:44 IST
दिग्दर्शक व निर्माता करण जोहरचे आत्मचरित्र ‘अॅन अनसूटेबल बॉय’ प्रकाशित झालेय. या पुस्तकाची धडाक्यात आॅनलाईन विक्री सुरु आहे. कारण ...
करण म्हणतो, माझ्या व काजोलच्या नात्यात आता काहीही उरलेले नाही
दिग्दर्शक व निर्माता करण जोहरचे आत्मचरित्र ‘अॅन अनसूटेबल बॉय’ प्रकाशित झालेय. या पुस्तकाची धडाक्यात आॅनलाईन विक्री सुरु आहे. कारण यात करणने आपल्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली आहेत. सुरुवातीपासून करणच्या सेक्शुअॅलिटीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. करणने आपल्या आत्मचरित्रात याबद्दलही खुलासा केला आहे. याच आत्मचरित्राच्या माध्यमातून करणने असाच आणखी एक नवा खुलासा केला आहे. होय,काजोजसोबत बिघडलेल्या संबंधांबद्दल करणने यात तपशीलवार लिहिले आहे. या मतभेदाचे कारण सर्वांनाच अचंबित करणारे आहे.गतवर्षी करण आणि काजोल यांच्यात मतभेद निर्माण झालेत. करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि काजोलचा पती अजय देवगण याचा ‘शिवाय’ हे दोन चित्रपट गतवर्षी बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी धडकले. याच बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे करण व काजोलमध्ये दुरावा निर्माण झाला. करणने केआरकेला ‘शिवाय’ची नकारात्मक प्रसिद्धी करण्यासाठी पैसे दिलेत, अशी बातमी त्यावेळी पसरली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर करणने आपल्या आत्मचरित्रात काही खुलासे केले आहेत. काजोलसोबत आता माझे कुठलेही नाते राहिलेले नाही, असे त्याने सांगून टाकले आहे.आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. कारण मला जे झाले ते सगळे चव्हाट्यावर आणायचे नाही. दोन दशकांपासून आमची घनिष्ठ मैत्री होती. पण आता आम्ही एकमेकांकडे पाहून केवळ हाय-हॅलो करतो व पुढे निघतो. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. मी समजू शकतो. मी तिच्या अतिच जवळ होतो. पण आता आमच्यातील सगळे काही संपलेले आहे. तिने मला चांगलेच दुखावले, असे करणने यात लिहिले आहे.काजोलसोबतच्या मतभेदामागचे कारण स्पष्टपणे करणने दिलेले नाही. पण आपण त्याचा अंदाज नक्कीच बांधू शकतो. आता काजोल यावर काय बोलते, ते बघूच!!