Join us

काजोलनंतर कंगना राणौतसोबतही होणार का करण जोहरचे पॅचअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 11:08 IST

अखेर करण जोहर आणि त्याची बेस्ट फ्रेन्ड काजोल यांच्यात पॅचअप झालेच. गतवर्षी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. पण करणने ...

अखेर करण जोहर आणि त्याची बेस्ट फ्रेन्ड काजोल यांच्यात पॅचअप झालेच. गतवर्षी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. पण करणने यश व रूही या आपल्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला अन् काजोलने तो लाईक केला. बस्स इतके निमित्त झाले आणि करणचे हृदय द्रवले. त्याने काजोलपुढे पुन्हा मैत्रीचा हात पुढे करत, तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केले. आता हाच कित्ता करण व कंगना राणौतबद्दल गिरवला जातो का? हा खरा प्रश्न आहे. नेपोटिझमवरून कंगना व करण या दोघांमधला वाद अद्यापही शमलेला नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. तेव्हापासून या मुद्यावर करण व कंगना या दोघांमध्ये चांगलीच तणाताणी सुरु आहे. न्यूयॉर्कमध्ये तीन-चार दिवसांपासून रंगलेल्या ‘आयफा अवार्ड2017’ सोहळ्यातही याचा एक अध्याय गाजला होता.  आयफा अवार्ड होस्ट करणारे सैफ अली खान, वरूण धवन व करण जोहर यांनी या सोहळ्याच्या मंचावर कंगना राणौतला डिवचायची एकही संधी सोडली नव्हती.   त्यानंतर या तिघांना ही नेटिझन्सनी धारेवर धरले होते. नोटिझन्सने धारेवर धरल्यावर या तिघांनी आप-आपल्या पद्धतीने कंगनाची माफी मागितली होती. वरुणने ट्विटरवरुन मागितली होती तर सैफने तिला एक ओपन लेटर लिहिले होते. विशेष म्हणजे, सैफच्या ओपन लेटरला कंगनाने सुद्धा ओपन लेटर लिहुन चोख प्रतिउत्तर दिले होते. यानंतर एका मुलाखतीत करण जोहरने हा विषय आता आपल्यासाठी संपल्याचे म्हटले होते. पण करणसाठी हा विषय जसा संपला तसाच कदाचित कंगनासाठीही संपला. कारण काल-परवा ‘सिमरन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कंगनाने यावर बोलणे टाळले.  आता किती दिवस तोच तो विषय उगाळणार. मला जे काही बोलायचे ते मी बोलून चुकलेय, असे कंगना यावेळी म्हणाली. त्यामुळे कंगना व करण आता एकाच वळणावर येऊन थांबलेत, असे म्हणायला हरकत नाहीच. उद्या कदाचित कंगनाने ‘सिमरन’च्या स्पेशल स्क्रिनिंगला करणला बोलवलेच आणि करण गेलाच तर हा वाद कायमचा निकाली निघणे शक्य आहे. शेवटी बॉलिवूडमध्ये अशक्य काहीच नाही, हेच खरे.