Join us

करण जोहरच्या चॅट शोवर ‘त्या’ दोघींची ‘रोलरकोस्टर राईड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:48 IST

दिग्दर्शक करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोने आता सर्वसामान्यांसहित ‘बी टाऊन’ मधील कलाकारांच्या मनामध्येही क्रेझ निर्माण केली ...

दिग्दर्शक करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोने आता सर्वसामान्यांसहित ‘बी टाऊन’ मधील कलाकारांच्या मनामध्येही क्रेझ निर्माण केली आहे. अनेक कलाकार या शोवर येण्यासाठी अक्षरश: उत्सुक असतात. आता हेच पाहा ना, ‘बॉलिवूडचा चॅटरबॉक्स’ म्हणून ओळखली जाणारी तुमची-आमची लाडकी बेबो अर्थात करिना कपूर खान आणि ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर या दोघीही बऱ्याच दिवसांपासून करण जोहरच्या चॅट शोवर जाण्यासाठी उत्सुक होत्या. अखेर, त्या दोघींना करण जोहरचं निमंत्रण आलं अन् त्यांनी या शोमधून ‘रोलरकोस्टर राईड’ अनुभवली. करणचा स्पेशल ‘रॅपिड फायर’ सेशन यांच्यामुळे त्यांनी धम्माल, मस्ती एन्जॉय केली. या शोचे प्रसारण लवकरच होईल.         थेट आणि मुद्देसुद प्रश्नांची मांडणी हे ‘कॉफ विथ करण’ या शोचे खरे वैशिष्ट्य मानले जाते. त्याच्या प्रश्नांमुळे भल्याभल्या कलाकारांची भंबेरी उडते. मध्यंतरी, ‘दंगल’च्या प्रमोशनसाठी आमिर खान आला असताना करणने त्याला जावेद अख्तरसंदर्भात प्रश्न विचारला होता. तेव्हा बॉलिवूडचा ‘मि.परफेक्शनिस्ट’ देखील अडखळला होता. करिना कपूर खान आणि सोनम कपूर यांच्या शोचे चित्रीकरण अलीकडेच करण्यात आले आहे. गप्पांच्या ओघात करणने सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये हॉलिवूडला जाण्याचा ट्रेंड सुरू झाला असल्याबद्दल विचारले तेव्हा बेबोने तिच्या नेहमीच्या हटके अंदाजात उत्तर दिले की,‘मला अ‍ॅवॉर्ड्समध्ये नाही तर रिवॉर्डसमध्ये रस आहे. म्हणजेच मला अवॉर्डची नव्हे तर माझी चाहत्यांकडून होणारी कौतुकाची अपेक्षा आहे.’ सध्याच्या ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्री दीपिका, कॅटरिना, प्रियांका यांच्यासोबत मला स्पर्धा करायचे नसल्याचेही करिनाने सांगितले.सोनम कपूरने मात्र मोठ्या हुशारीने करण जोहरचा हा प्रश्न टाळला. ‘हॉलिवूडमध्ये कोणी जावं, कसं जावं, कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी काय वेगळं सांगणार?’ सोनमच्या या उत्तरावरून तिच्यातील चाणाक्ष आणि हुशार बुद्धीचे दर्शन घडते.