Join us

​सेक्ससाठी करण जोहरने दिले होते पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 11:16 IST

करण जोहरची जीवनगाथा (बायोग्राफी) ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ सध्या फारच गाजत आहे. त्याच्या जीवनातील अत्यंत खासगी गोष्टींबद्दल त्याने एकदम मोकळेपणाने ...

करण जोहरची जीवनगाथा (बायोग्राफी) ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ सध्या फारच गाजत आहे. त्याच्या जीवनातील अत्यंत खासगी गोष्टींबद्दल त्याने एकदम मोकळेपणाने लिहिलेले आहे. काजोलशी संबंध पूर्णत: तुटल्याचे प्रकरण अद्याप गरम असताना पुस्तकातील आणखी एक शॉकिंग माहिती बाहेर आली आहे.करणने सेक्स करण्यासाठी पैसे दिले होते. वयाच्या २६ व्या वर्षी आपण सर्वप्रथम लैंगिक सुखाचा अनुभव घेतल्याचे त्याने याआधीच सांगितले आहे. त्याच दरम्याने तो लिहितो की, ‘सेक्सबाबतीत अत्यंत अनुनभवी असल्याने मी न्यूयॉर्कमध्ये पैसे देऊन सेक्स करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पहिल्यावेळेस तर मी भीतीपोटी काही केलेच नाही परंतु एका आठवड्याने मी पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळेस माझी इच्छा अपूर्ण ठेवली नाही. पण मला त्यानंतर  फार अपराधीपणा वाटला. स्वत:ची लाज वाटली. पैसे देऊन या गोष्टींचा खरा अनुभव येत नसतो. कारण प्रेमाशिवाय याला काहीच अर्थ नसतो.’या पुस्तकात तो सेक्स याविषयावर जास्त भर का देत आहे याचे स्पष्टीकरण देताना तो सांगतो की, ‘मी फार सुरक्षित वातावरणात वाढलो आहे. मला कोणी भाऊ नाही आणि वडिल व माझ्यामध्ये वयाचे खूप मोठे अंतर असल्यामुळे या गोष्टींबद्दल मला सांगणारे कोणी नव्हते. माझे मित्रसुद्धा असेच सुखवस्तू कुटुंबातील होते. आम्ही सगळेच जण सेक्स याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो.’नव्या वर्षाची सुरुवात करणच्या या ‘कॉन्ट्रोव्हर्शल’ पुस्तकाने झाल्यामुळे येणाऱ्या संबंध वर्षात हे वाद गाजतील अशी चिन्हे आहे. एकेकाळी जीवाभावाचे मित्र-मैत्रिण असणारे करण-काजोल आता एकमेकांना बोलतही नाही. तो लिहितो, ‘काजोल आणि माझ्यामध्ये आता काहीच राहिले नाही. २५ वर्षांची आमची मैत्री संपुष्टात आली आहे. याला ती जबाबदार नसून, तिचा नवरा कारणीभूत आहे. हे सर्व ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादापूर्वीच्या गोष्टी आहे. नेमके कारण तर मी सांगणार नाही. ते फार वैयक्तिक आहे. मैत्रीचा आदर राखून मी त्यावर सविस्तर बोलणे टाळतोय.’