Join us

करण जोहरची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:26 IST

‘बॉम्बे वेलवेट’मध्ये करण जोहरने खलनायकाची भूमिका बजावली होती. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची बºयापैकी चर्चा झाली. मात्र, करणच्या ...

‘बॉम्बे वेलवेट’मध्ये करण जोहरने खलनायकाची भूमिका बजावली होती. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची बºयापैकी चर्चा झाली. मात्र, करणच्या दृष्टीने अभिनयातील त्याचे पदार्पण निराशदायी ठरले. ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’च्या ट्रेलर लॉन्चिंगनंतर तो म्हणाला, ‘‘बॉम्बे वेलवेटनंतर अभिनेता म्हणून काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, असे वाटले होते. मात्र, अद्याप माझी इच्छा पूर्ण झालेली नाही. कोणीतरी मला रोल द्यावा, यासाठी मी आतुरतेने वाट बघत आहे. मला सहायक अभिनेत्याची भूमिका करायला आवडेल.’’ कपूर अ‍ॅण्ड सन्स चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी करणने पेलली असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, फवाद खान, ऋषी कपूर, रत्ना पाठक आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत. १८ मार्चला हा चित्रपट देशभरात रिलीज होत आहे.