Join us  

करण जोहर सज्ज! पुन्हा एकदा पाहायला मिळणार धम्माल ‘दोस्ताना’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 8:56 PM

प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ आठवतोय? २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता.

प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ आठवतोय? २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहमच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, लवकरच ‘दोस्ताना2’ येणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण नव्या रूपात, नव्या स्टार्ससह. होय, ‘दोस्ताना2’ची स्क्रिप्ट तयार आहे. करण जोहर या चित्रपटासाठी कमालीचा उत्सूक आहे. पण यात त्याला नवी स्टारकास्ट हवी आहे. त्यामुळे प्रियांका, जॉन आणि अभिषेक या त्रिकुटाऐवजी नवे चेहरे या चित्रपटात दिसतील.साहजिकच, जुन्या कलाकारांना याचे दु:ख होणारच. जॉन तर ही बातमी ऐकून प्रचंड दु:खी झालाय. मी या चित्रपटाचा भाग नसणार, याचे सर्वाधिक दु:ख आहे. पण करणच्या या चित्रपटाला मी शुभेच्छा देईल, असे जॉन म्हणाला.आता करणचा हा नवा ‘दोस्ताना2’ कसा रंगतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

टॅग्स :करण जोहर