‘कपूर अॅण्ड सन्स’ टीमचे प्रेक्षकांना सरप्राईज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 12:39 IST
जो अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्याला आवडतात ते अचानक जर आपल्यासमोर आले तर काय होईल? कधी विचार केलाय का ? ...
‘कपूर अॅण्ड सन्स’ टीमचे प्रेक्षकांना सरप्राईज!
जो अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्याला आवडतात ते अचानक जर आपल्यासमोर आले तर काय होईल? कधी विचार केलाय का ? नाही ना! नुकताच असा एक किस्सा चित्रपट रिलीज झाल्यानंतर झाला.शकुन बत्रा यांचा ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपट रिलीज झाला आणि अनेक टीका, कौतुक संमिश्र प्रतिक्रिया चाहत्यांकडून मिळाल्या. शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’ची टीम म्हणजेच आलिया-सिद्धार्थ-फवाद हे सरप्राईज म्हणून एका थिएटरच्या बाहेर जाऊन थांबली.जेव्हा प्रेक्षक थिएटरमधून चित्रपट पाहून बाहेर आले तेव्हा त्यांनी काय पाहिले ? त्यांचे फेव्हरेट स्टार्स त्यांच्यासमोर आहेत. प्रचंड आनंद त्या प्रेक्षकांच्या चेहºयावर होता. तसेच अनेकांनी त्यांच्या सोबत सेल्फीही काढले. चित्रपटाकडून टीमला खुप अपेक्षा होत्या. त्यांनी चित्रपट रिलीज होण्याअगोदर प्रचंड प्रमोशन केले होते.