कपिल शर्माचा खास मित्र राजीव ढिंगराचा मोठा खुलासा! कपिलच्या आजच्या स्थितीसाठी ‘या’ व्यक्तिला ठरवले जबाबदार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 10:11 IST
सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कॉमेडियन कपिल शर्मा ‘फॅमिली टाईम विद कपिल’ या आपल्या नव्या को-या शोसह टीव्ही स्क्रीनवर परतला. या ...
कपिल शर्माचा खास मित्र राजीव ढिंगराचा मोठा खुलासा! कपिलच्या आजच्या स्थितीसाठी ‘या’ व्यक्तिला ठरवले जबाबदार!!
सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कॉमेडियन कपिल शर्मा ‘फॅमिली टाईम विद कपिल’ या आपल्या नव्या को-या शोसह टीव्ही स्क्रीनवर परतला. या शोनंतर आता कपिलचे आयुष्य पूर्वपदावर येईल, असा त्याच्या चाहत्यांना अंदाज होता. पण कदाचित असे नाहीये. एकीकडे कपिलचा नवा शो पाहून लोकांना नाके मुरडली अन् दुसरीकडे कपिलचे आयुष्य पूर्वपदावर येण्याआधी त्याच्या अडचणीत आणखी भर पडली. आधी प्रसारमाध्यमांना अर्वाच्य शिव्या देऊन कपिल चर्चेत आला. नंतर त्याने एक्स गर्लफ्रेन्ड व एका संपादकाविरूद्ध एफआयआर नोंदवला. आता तर कपिल पुन्हा डिप्रेशनमध्ये गेल्याचे ऐकू येऊ लागले आहे. कपिलचा जवळचा मित्र आणि ‘फिरंगी’ या चित्रपटाचा दिर्ग्शक राजीव ढिंगरा याने कपिलच्या या स्थितीसाठी एका व्यक्तिला जबाबदार ठरवले आहे. होय, मुंबई मिररशी बोलताना राजीवने कपिलच्या या स्थितीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस आणि तिची बहीण नीति सिमोस या दोघींना जबाबदार धरले. कपिल व मी आम्ही दोघेही पंजाबच्या एका लहानशा शहरातून आलोत. आम्हाला या मुलींसारखे लोकांना मॅन्युप्लेट करता येत नाही. कपिल आज ज्या वळणावर येऊन उभा आहे, त्यासाठी केवळ प्रिती सिमोस आणि तिची बहीण जबाबदार आहे. या दोघींनी मलाही असाच त्रास दिला होता. कपिलला तुझ्यापासून दूर करून राहिल, अशी धमकी त्यांनी मला दिली होती. कपिल गिन्नीसोबत लग्न करणार, हे कळताच प्रिती खवळली आणि तिने कपिलचे आयुष्य ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. कपिलच्या सगळ्या मित्रांना त्याचे शत्रू बनवले. कपिलला आयुष्यातून उठवण्याचे तिचे प्रयत्न आहेत, असे राजीवने सांगितले. ALSO READ : वाचा,कपिल शर्माच्या मानसिक स्थितीबद्दल काय बोलली एक्स- गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस !!कपिल गिन्नीसोबत लग्न करतोय, हे भारतीने प्रितीला सांगितले होते. तेव्हा कपिल एक स्टार आहे. गिन्नीसारखी लहानशा गावातली मुलगी त्याला शोभत नाही, असे प्रिती तिला म्हणाली होती, असा दावाही राजीवने केला. यावेळी राजीवने सुनील ग्रोव्हर यालाही फैलावर घेतले. सुनीलने आपल्या स्वार्थासाठी कायम कपिलचा एखाद्या कळसूत्रीसारखा वापर केलाय. सध्या आम्ही काही जण कपिलला या संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. कपिल आई प्रचंड घाबरली आहे. कपिलने जीवाचे बरे वाईट केले तर, ही भीती तिला सतावते आहे. कपिल एक भावूक व्यक्ती आहे आणि प्रितीसारख्या लोकांनी त्याच्या याच स्वभावाचा फायदा घेतला, असे राजीव म्हणाला.