दोन महिन्यांपासून कुठे गायब होता कपिल शर्मा? जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:25 IST
कॉमेडी किंग कपिल शर्मा गत दोन महिन्यांपासून गायब होता. पण काल रात्री उशीरा तब्बल दोन महिन्यानंतर कपिल अचानक उगवला. ...
दोन महिन्यांपासून कुठे गायब होता कपिल शर्मा? जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!
कॉमेडी किंग कपिल शर्मा गत दोन महिन्यांपासून गायब होता. पण काल रात्री उशीरा तब्बल दोन महिन्यानंतर कपिल अचानक उगवला. रात्री साडे अकराच्या सुमारास ट्विट करून आपण लवकरच परतणार असल्याची बातमी कपिलने दिली. गत ६ एप्रिलला कपिलने त्याचे अखेरचे ट्विट केले होते. काही लोक चुकीच्या पद्धतीने मला बदनाम करण्याचे प्रयत्न करत आहेत, असे ट्विट त्याने केले होते. त्याच्या या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. याचकाळात एका वेबसाईटच्या संपादकास आक्षेपार्ह शिव्या देणारा त्याचा आॅडिओही व्हायरल झाल्याने कपिल गोत्यात आला होता. याचदरम्यान कपिलचा नवा शो ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ आला होता. पण या शोचा पहिलाच एपिसोड पाहून लोकांनी नापसंती व्यक्त केली होती. परिणामी कपिलचा हा शो बंद करण्यात आला होता. यानंतर कपिल अचानक गायब झाला होता. पण काल रात्री त्याने ट्विट केले आणि मी चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅट करणार, असे त्याने जाहिर केले. त्याच्या या ट्विटला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तू इतक्या दिवसांपासून कुठे होता, असे एका चाहत्याने त्याला विचारले, यावर मी ट्रॅव्हलिंग करत होतो, असे उत्तर त्याने दिले. मी लवकरचं नवा शो घेऊन येतोय, असे चॅटदरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने स्पष्ट केले. तू आधी सारखाच फिट आहेस ना? जिमला जातोस का? असे एका चाहत्याने त्याला विचारले. यावर मी आधीपेक्षा थोडा जाड झालो आहे, असे त्याने सांगितले. लवकरच जुन्या शेपमध्ये परतेल़ यानंतर माझे प्रोफाईल पिक्चर बदलेल, असेही त्याने स्पष्ट केले. शेवटी मी माझी जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करतोय. गुड नाईट, असे म्हणून कपिलने चॅटदरम्यान चाहत्यांचा निरोप घेतला.ALSO READ : कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेंड आणि पत्रकाराविरोधात दाखल केली तक्रार गतवर्षी सुनील ग्रोव्हर सोबत केलेल्या वादामुळे कपिल शर्मा वादात अडकला होता. यानंतर अनेक कलाकारांना कपिलने सेटवर वाट पाहायला लावली आणि शूटिंग केल्याशिवायच या कलाकारांना परतावे लागले. त्याच दरम्यान कपिल डिप्रेशनमध्ये सुद्धा गेल्या होता.