Join us  

किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 3:11 PM

‘गली बॉय’ च्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली.

ठळक मुद्देरणवीरने रॅप केले, चाहत्यांसोबत डान्स केला. तर आलियाने चाहत्यांसाठी गाणे गायले. शोमध्ये किकू शारदा हाही आलियासोबत मस्ती करताना दिसला.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटात रणवीर सिंग आलियाच्या अपोझिट दिसणार आहे. अलीकडे आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली.

रणवीरने रॅप केले, चाहत्यांसोबत डान्स केला. तर आलियाने चाहत्यांसाठी गाणे गायले. शोमध्ये किकू शारदा हाही आलियासोबत मस्ती करताना दिसला. त्याने आलियाला अनेक प्रश्न केलेत. यापैकीचं एक प्रश्न होता, अशी कोणती ‘वाईन’ आहे, जी आपण पिऊ शकत नाही, केवळ खाऊ शकतो. आलिया या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. मग किकू स्वत:च ‘अजवाईन’ असे उत्तर देतो आणि सगळे खदखदून हसतात. आलियाही जोरजोरात हसते. पण प्रश्नोत्तराचा हा ‘सिलसिला’ इथेच थांबत नाही. आलिया सुद्धा किकूला एक प्रश्न विचारते. अशी कोणती ‘वाईन’ आहे जी आपण ना पिऊ शकत, ना खाऊ शकत. फक्त बोलू शकतो? असे ती विचारते. आलियाच्या या प्रश्नावर किकू निरूत्तर होतो. मग काय आलियाच या प्रश्नाचे उत्तर देते, ते म्हणजे ‘डिवाईन’. तिचे ते उत्तर ऐकून पुन्हा सगळीकडे खसखस पिकते. एकंदर काय तर आलियाचा पीजे किकूच्या जोक्सवर भारी पडतो.

टॅग्स :आलिया भटरणवीर सिंगकपिल शर्मा