Join us  

या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:12 PM

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली.

ठळक मुद्दे कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले.  

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. होय, या महिन्यात १८ तारखेला ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर प्रदर्शित होतोय. या ट्रेलर रिलीजसाठी एका भव्या इव्हेंटचे आयोजन करण्यात येणार आहे. कंगना राणौत व ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ची अख्खी टीम या इव्हेंटला हजर असेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर रिलीज केला गेला होता. त्यात कंगना घोडेस्वारी करताना दिसली होती.

या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्सआॅफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.

क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. यानंतर चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये दिग्दर्शकाच्या नावावरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली. क्रेडिट लाईनमध्ये कंगनाचे नाव असेल, असे काहींनी म्हटले. काहींनी ती सहदिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेणार, असे सांगितले तर काहींनी दिग्दर्शनाचे क्रेडिट घेण्यास कंगनाने नकार दिल्याचेही सांगितले. पण आता ताज्या बातमीनंतर सगळे काही स्पष्ट झाले आहे. कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले.  

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत