Join us  

‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:27 PM

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर30’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. पण शूटींग पूर्ण होताच हृतिकची चिंता वाढली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर30’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. या चित्रपटात हृतिक बिहारचा गणितज्ज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. पण शूटींग पूर्ण होताच हृतिकची चिंता वाढली आहे.चित्रपटात हृतिकच्या अपोझिट असणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्याची माहिती दिली. मृणाल या चित्रपटात हृतिकच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. खरे तर हृतिकचा हा चित्रपट आधी आनंद कुमार यांचे बायोपिक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार होता. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी चित्रपटाच्या कथेत बदल करण्यात आले. आनंद कुमार यांच्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा वाद वाढण्याची चिन्हे दिसताच कथेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण निर्मात्यांना चित्रपटाबद्दल कुठलाही वाद नको होतो. निर्मात्यांनी हा वाद तर टाळला पण आता एक नवे ‘संकट’ या चित्रपटापुढे येऊन उभे ठाकले आहे. होय, हे संकट म्हणजे, बॉक्सआॅफिसवरच्या क्लॅशचे.

 होय, हृतिकचा हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.  नेमक्या याच दिवशी  कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपटही रिलीज होतो आहे. नेमकी हीच गोष्ट हृतिकचे टेन्शन वाढवणारी ठरते आहे. हृतिक व कंगनाचा वाद जगजाहिर आहे. एकेकाळचे हे कथित ‘प्रेमी’ आज एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत.त्यामुळेचं ‘सुपर30’ विरूद्ध ‘मणिकर्णिका’ हा बॉक्सआॅफिसवरचा संघर्षही तेवढाच मोठा असणार आहे. आता यात कोण बाजी मारत, ते लवकरचं दिसेल.

नंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.  

 

 

टॅग्स :हृतिक रोशन