Join us  

कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन

By तेजल गावडे | Published: October 08, 2020 2:36 PM

अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील या दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि 'तेजस' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

आज संपूर्ण देश भारतीय वायूसेनेच्या शौर्याला सलाम करत आहेत. त्यांच्या शौर्यावर गर्व व्यक्त करत आहे. आज भारतीय वायूसेना ८८वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्ताने गाजियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेने आपले शक्ती प्रदर्शन करत आहे. आता अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील या दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तेजस चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

कंगना राणौत तेजस चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि लोकांना खूप भावले आहे. नेहमीप्रमाणे कंगनाने आपल्या लूकने चाहत्यांना चकीत केले आहे. आता भारतीय वायूसेना दिनाच्या निमित्ताने कंगनाने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. तिने ट्विट करत लिहिले की, तेजस चित्रपटाच्या टीमकडून सर्वांना एअरफोर्स डेच्या शुभेच्छा. आमचा चित्रपट एअरफोर्सची महानता दर्शवणार आहे आणि त्यांच्या शौर्याला ट्रिब्युट देणार आहे. जय हिंद. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारतीय वायूसेनेने २०१६ साली महिलांना लडाखू भूमिकेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. आता कंगनाचा आगामी चित्रपट तेजस याच ऐतिहासिक घटनेने प्रेरीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून वायूसेनेच्या धैर्याला सलाम केला जाणार आहे.

तेजसचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत आहे. असे सांगितले जात आहे की या चित्रपटाच्या शूटिंगला या वर्षी डिसेंबरमध्ये सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे. सध्या कंगना थलाइवी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती तेजस चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील मर्डर थेअरी फेटाळून लावल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. आज दिवसभर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. आता कंगना राणौतने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. कंगना राणौतने #KanganaAwardWapasKar सोबत ट्विट करत म्हटले की, ही आहे माझी मुलाखत जर स्मृती भ्रंश झाली असेल तर पुन्हा पहा, जर मी एकही खोटा किंवा चुकीचा आरोप लावला असेल तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, हे एका क्षत्रियचं वचन आहे. मी राम भक्त आहे, प्राण जाईल पण वचन तोडणार नाही. जय श्री राम.

टॅग्स :कंगना राणौतभारतीय हवाई दल