Join us  

दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

By तेजल गावडे | Published: November 14, 2020 2:35 PM

कंगनाच्या भावाचे नुकतेच उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर कंगनाने आता कंगनाने घरी वहिनीचे स्वागत केले आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने तिच्या नवीन वहिनीचे स्वागतही केले आहे. नुकतेच कंगनाच्या भावाचे उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर कंगनाने आता कंगनाने घरी वहिनीचे स्वागत केले आहे.

 कंगनाने फोटो शेअर करत लिहिले की, दिवाळीच्या दिवसात महालक्ष्मी घरात येते, आमच्या घरीदेखील देवी येत आहे. आज आमची वहिनी पहिल्यांदाच घरी येत आहे आम्ही या रिवाजाला अंदरेरा (गृहप्रवेश) म्हणतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

कंगना राणौतने भावाच्या संपूर्ण लग्नाची जबाबदारी घेतली होती आणि यासोबतच तिने कोटी रुपये खर्च केले आहे. कंगनाची बहिण रंगोलीने याबद्दल माहिती दिली आहे. रंगोली चंडेलने लिहिले की, मी काही सुपरस्टार्सना ओळखते जे लग्न अशा शाही ठिकाणी करतात. पण मी अशा कोणत्या व्यक्तीला पाहिले नाही जो आपल्या भाऊ किंवा बहिणीसाठी असे करते जसे कंगनाने केले आहे. कंगनाने फक्त कोटी रुपये खर्च केले नाहीत तर एका वर्षापासून ती प्रत्येक छोट्या गोष्टीवर काम करते आहे. कंगनामध्ये बरेच काही आहे पण दुःखाची बाब ही आहे की लोक बेधडक आणि बिनधास्त याच गोष्टीवर फोकस करतात. आपल्या जवळच्या लोकांमध्ये मिसळणे तिचा प्रेमळ स्वभाव तिची सर्वात मोठी ताकत आहे. भावनिक झाले आहे, खूपच भावनिक वाटत आहे.

कंगना राणौतने व्हिडीओ शेअर करत लिहिले होते की, जे सर्व जे माझ्या लेहंग्याबद्दल विचारत होते. हा एक गुजराती बांधनी लेहंगा आहे जो तयार करायला जवळपास १४ महिने लागले आहेत. या लेहंग्यात खूप कलाकुसर आहे.

डिझायनर अनुराधा वकीलने हे स्वप्न साकार केले आहे आणि माझा फ्रेंड सब्यासाचीने माझ्यासाठी ज्वेलरी डिझाइन केली आहे.

टॅग्स :कंगना राणौतरांगोळी