Join us  

करिना कपूरचा पत्ता कट ! सीता मातेच्या भूमिकेसाठी आता ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 8:00 AM

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली.अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली...

ठळक मुद्देकरिनाला सीता मातेच्या भूमिकेत घेतले तर आम्ही हा सिनेमा हाणून पाडू, चित्रपटावर बहिष्कार टाकू, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या.

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान  (Kareena Kapoor Khan) दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली. सीता मातेच्या या भूमिकेसाठी बेबोने 12 कोटी रूपयांची मागणी केल्याची चर्चा कानावर आल्यावर तर लोक आणखीच बिथरले. अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सीता मातेच्या भूमिकेत करिना दिसलीच तर तिला बॉयकॉट करू, सिनेमाचे प्रदर्शन हाणून पाडू, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतके कमी की काय म्हणून बरजंग दलानेही या वादात उडी घेतली. तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, अशी धमकीवजा इशाराच बजरंग दलाने दिला. इतक्या मोठ्या वादानंतर या सिनेमातून करिनाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. होय, चर्चा खरी मानाल तर आता निर्माते करिना ऐवजी कंगना राणौतला (Kangana Ranaut) या सिनेमात कास्ट करू इच्छित आहेत.

रिपोर्टनुसार, संबंधित चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेन्द्र प्रसाद यांना कंगना या सिनेमासाठी बेस्ट असल्याचे वाटतेय. त्यांची ती पहिली पसंत आहे. अर्थात अद्याप मेकर्सनी कास्टींगबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्रांने केलेल्या दाव्यानुसार, मेकर्सनी कधीच या सिनेमासाठी करिना कपूरशी संपर्क साधला नव्हता. ही चर्चा कुठून सुरू झाली, हेही मेकर्सला माहित नाही.दरम्यान करिना सीता मातेची भूमिका साकारणार, अशी चर्चा सुरू होताच सोशल मीडियावरचे वातावरण तापले होते. अनेकांनी तिच्या नावाला विरोध केला होता. करिनाला सीता मातेच्या भूमिकेत घेतले तर आम्ही हा सिनेमा हाणून पाडू, चित्रपटावर बहिष्कार टाकू, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या.

टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीना कपूरच्या विरोधात जिल्हाधिका-यांकडे एक निवेदन दिले होते. करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार झालाच तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असे त्यांनी या निवेदनात म्हटले होते. आपल्या निवेदनासोबत त्यांनी करीनाचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील जोडले होते. 

टॅग्स :करिना कपूरकंगना राणौत