Join us  

मी कधीच रडत नाही, पण आज...!  ‘थलायवी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगना राणौत ढसाढसा रडली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 3:30 PM

Thalaivi Trailer : इव्हेंट सुरु झाला आणि अचानक कंगना भावूक झाली. इतकी की, स्टेजवर ढसाढसा रडू रडली

ठळक मुद्दे‘थलायवी’ हा सिनेमा  येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा आज वाढदिवस. आज कंगनाच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून तिच्या ‘थलायवी’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. चेन्नईत ‘थलायवी’चा ग्रॅण्ड ट्रेलर लॉन्च इव्हेंट आयोजित केला गेला. यावेळी कंगनासोबत ‘थलायवी’ची संपूर्ण टीम हजर होती. इव्हेंट सुरु झाला आणि अचानक कंगना भावूक झाली. इतकी की, भरस्टेजवर ढसाढसा रडू लागली. कंगनाचा हा इमोशनल अवतार पाहून तिथे उपस्थित प्रत्येकजण हैराण झाला.

कंगनाने या भावूक क्षणाचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, ‘मी स्वत:ला बब्बर शेरनी म्हणते. कारण मी कधीच रडत नाही आणि कोणालाही मला रडवण्याची संधीही देत नाही. मी यापूर्वी कधी रडले होते, मला आठवत नाही. पण आज मी रडले...खूप रडले आणि आता मला एकदम मोकळे वाटतेय....’ या व्हिडीओत कंगना ‘थलायवी’चे दिग्दर्शक विजय यांची प्रशंसा करताना दिसतेय. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विजय यांनी खूप सहकार्य केले. माझ्यात इतकी प्रतिभा आहे की, मी ही इतकी कठीण भूमिका साकारू शकते, हा विश्वास त्यांनी माझ्यात निर्माण केला, असे कंगना म्हणते आणि तिला तिचे अश्रू रोखता येत नाही.

‘थलायवी’ हा सिनेमा  येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमासाठी कंगनाला वजन वाढवावे लागले होते. विशेष म्हणजे, एकदा वजन वाढवून तिला पुन्हा स्लीमट्रीम व्हायचे होते. काही महिन्यात 20 किलो वजन वाढवणे आणि पुन्हा ते घटवणे हे आव्हान कंगनाने स्वीकारले होते.

टॅग्स :कंगना राणौतथलायवी