Join us  

आम्ही ‘त्या’ तीन माकडांसारखे वागू शकत नाही...! कमल हासन नव्या चित्रपट धोरणावर संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 5:36 PM

Kamal Haasan Tweet : सरकारच्या प्रस्तावित सिनेमेटोग्राफर अ‍ॅक्ट 2021 ला विरोध करत कमल हासन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा-१९५२ मध्ये बदल करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे.

अभिनेता ते  राजकीय नेता असा प्रवास करणारे कमल हासन (Kamal Haasan)  यांचे ट्वीट  सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या नियमावलींमध्ये काही बदल करण्याचे ठरवले आहे आणि या बदलांविरोधात चित्रपटसृष्टीतील काही मंडळींनी आवाज उठवला आहे. कमल हासन यापैकीच एक. सरकारच्या प्रस्तावित सिनेमेटोग्राफर अ‍ॅक्ट 2021 ला विरोध करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Kamal Haasan Tweet)

‘सिनेमा, मीडिया आणि साहित्याशी संबंधित असलेले लोक भारताची तीन प्रतिकात्मक माकडांसारखे वागू शकत नाहीत. वाईट पाहाणे, ऐकणे आणि बोलणे हे लोकशाहीला इजा पोहोचवण्याचा व दुर्बल करणाचा प्रयत्न आहे,’ अशा  आशयाचे ट्वीट कमल हासन यांनी केले आहे. कृपया, आपल्या स्वातंत्र्याबद्दल विचार करा आणि काही करा, असे अन्य एका ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा-१९५२ मध्ये बदल करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे. हा कायदा अस्तित्वात आला तर सर्वात मोठा बदल घडून येईल तो म्हणजे सेन्सॉरशिपमध्ये सरकारी हस्तक्षेप करण्यास वाव मिळेल. एखादा चित्रपट तयार झाला की तो सेन्सॉर बोर्डाकडे जातो. चित्रपटातील आशयानुसार आणि चित्रीकरणानुसार सेन्सॉर बोर्डाकडून ए, एयू, यू यापैकी एका श्रेणीतील मिळाल्यानंतर चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होता. मात्र  हा कायदा अमलात आल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने जाहिर केलेले सिनेमा सर्टिफिकेट रद्द करण किंवा त्यावर पुनर्विचार करायला लावण्याचा संपूर्ण हक्क केंद्र सरकारला प्राप्त होणार आहे. थोडक्यात काय तर आधी एकदा का सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळाली की, चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असायचा. आता मात्र नव्या कायद्याअंतर्गत ही गोष्ट इतकी सहज सोपी राहणार नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी प्रस्तावित नियम अन्यायकारण असल्याचे म्हटले आहे.   नव्या निमयांनुसार बोर्डाने एखाद्या चित्रपटासंबंधी दिलेले प्रमाणपत्र मान्य नसेल तर निर्माते कोर्टात जाऊ शकतात. पण कोर्टाने व बोर्डाने एक प्रमाणपत्र दिल्यानंतर संबंधित चित्रपटाबद्दल काही आक्षेपार्ह शंका आल्या तर केंद्र चित्रपटाचे प्रमाणपत्र रिवाईज करू शकते. केंद्राने दिलेले प्रमाणपत्र अंतिम असणार आहे.  

टॅग्स :कमल हासन