Join us  

केआरकेने पुन्हा केले शाहरुख खानला लक्ष्य, सांगतोय या कारणामुळे शाहरुख देतोय फ्लॉप चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 2:02 PM

शाहरुखचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिटच होणार असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांत शाहरुख खानला एकही हिट चित्रपट देता आला नाहीये.

ठळक मुद्देएसआरके गेल्या पाच वर्षांपासून एकही हिट चित्रपट का देऊ शकला नाहीये? एसआरके हा सुपरस्टार आहे हे खरे आहे. पण चांगला चित्रपट बनवण्यासाठी काय करावे लागते हे त्याला ठाऊक आहे असे त्याला वाटते. मात्र ही चुकीची गोष्ट आहे आणि याचमुळे त्याचे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत.

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग आहे यात काहीच शंका नाही. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. शाहरुखचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिटच होणार असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांत शाहरुख खानला एकही हिट चित्रपट देता आला नाहीये. झिरो, जब हॅरी मेट सेजल असे त्याचे नजीकच्या काळात प्रदर्शित झालेले सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. 

शाहरुख खान अभिनय करत असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत असले तरी त्याची निर्मिती असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन करत आहेत. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला बदला हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानच्या रेड चीलीजची आहे. शाहरुख खान अभिनय करत असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप ठरत आहेत याचे कारण नुकतेच अभिनेता-निर्माता कमाल आर खान उर्फ केआरकेने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. केआरकेने नुकतेच एक ट्वीट केले आहे आणि त्यात म्हटले आहे की, एसआरके गेल्या पाच वर्षांपासून एकही हिट चित्रपट का देऊ शकला नाहीये? एसआरके हा सुपरस्टार आहे हे खरे आहे. एसआरके चांगला अभिनेता आहे हे खरे आहे. एसआरके खूप चांगला व्यवसायिक आहे हे खरे आहे. पण चांगला चित्रपट बनवण्यासाठी काय करावे लागते हे त्याला ठाऊक आहे असे त्याला वाटते. मात्र ही चुकीची गोष्ट आहे आणि याचमुळे त्याचे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. 

केआरकेने हे ट्वीट केल्यानंतर काहींनी त्याचे हे मत योग्य असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, शाहरुखसोबत काम करणारे हिट चित्रपटांचे दिग्दर्शक (रोहित शेट्टी- दिलवाले, इम्तियाज अली-जब हॅरी मेट सेजल) पण फ्लॉप झाले आहेत. 

केआरकेच्या या ट्वीटवर शाहरुख खानचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. त्यांनी केआरकेला म्हटले आहे की, तू पहिल्यांदा एखादा हिट चित्रपट दे आणि नंतर इतरांना सल्ला दे.... तसेच शाहरुखला सल्ला देण्याची तुझी लायकी देखील नाही असे शाहरुखच्या फॅन्सने केआरकेला सुनावले आहे.

टॅग्स :शाहरुख खानकमाल आर खान