Join us  

 गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही! लग्नाआधी आई होणार असलेल्या अभिनेत्रीचे रोखठोक विधान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 1:13 PM

ही अभिनेत्री सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय.

ठळक मुद्दे2009 मध्ये  देव डी  या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते.

अभिनेत्री कल्की कोच्लिन लग्नाआधी आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कल्कीने अचानक आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण खरे सांगायचे तर सुरुवातीच्या दोन महिन्यांत खुद्द कल्कीलाही आपण प्रेग्नंट आहोत हे माहित नव्हते. होय, खुद्द कल्कीने हा खुलासा केला.सुरुवातीच्या दोन महिन्यांत मी प्रेग्नंट आहे, याची मला स्वत:लाही कल्पना नव्हती. एखाद्या एलियनने आक्रमण करावे, असे हे होते. जणू  वॅम्पायर सारखे काही माझ्या शरीरातले सगळे काही शोषून घेत होते. पण पहिल्यांदा गर्भातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. ते सगळे रोमांचक होते. गर्भावस्थेचे पहिले तीन महिने अतिशय वाईट होते. पण आता सगळे काही ठीक आहे,असे कल्कीने ‘मिड डे’ ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत सांगितले.

कल्की यावेळी लग्नाबद्दलही बोलली. आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. पण केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली.

घटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.

2009 मध्ये  देव डी  या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

टॅग्स :कल्की कोचलीन