Join us  

काजोलच्या बहिणीची ‘बॉम्बे टू गोवा’ बाइक राइड, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 10:31 AM

अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिने नुकतीच तिची अ‍ॅडव्हेंचर ट्रिप पूर्ण केली. यावेळी तिने मुंबई ते गोवा इथपर्यंतचा प्रवास बाइकने पूर्ण केला. या ट्रिपदरम्यान तिने काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिने नुकतीच तिची अ‍ॅडव्हेंचर ट्रिप पूर्ण केली. यावेळी तिने मुंबई ते गोवा इथपर्यंतचा प्रवास बाइकने पूर्ण केला. या ट्रिपदरम्यान तिने काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तनीषाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये बरेचसे असे मित्र आहेत जे अ‍ॅडव्हेंचर ट्रिपवर जात असतात. यावेळेस त्यांनी मुंबई ते गोवा बाइकने जाण्याचा प्लॅन केला. त्याचबरोबर मलाही सोबत येण्यास सांगितले. या ट्रिपदरम्यान मी खूप एन्जॉय केला.तनीषाने इंडियन चीफ विंटेज बाइकवर जारेड सोलोमनसोबत राइड केली. या राइडदरम्यान तिने हायवेवर वडापाव खाण्याचाही आनंद घेतला.