Join us

​अजयच्या आगामी चित्रपटात काजोलची मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 19:26 IST

अजय देवगनचा ‘शिवाय’ बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करतो आहे. शिवायच्या यशाने अजय उत्साहित झालाय. त्याच्या आगामी चित्रपटात काजोलची प्रमुख ...

अजय देवगनचा ‘शिवाय’ बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करतो आहे. शिवायच्या यशाने अजय उत्साहित झालाय. त्याच्या आगामी चित्रपटात काजोलची प्रमुख भूमिका असल्याचे दिसतेय. आनंद गाधी याचे लोकप्रिय नाटक ‘शिप आॅफ थिसिअस’वर हा चित्रपट आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘शिवाय’च्या यशाने उत्साहित झालेल्या अजय देवगन याने आपल्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ‘शिप आॅफ थिसिअस’या नाटकाची कथा त्याने आपल्या आगामी चित्रपटासाठी निवडली आहे. आनंद गांधी याने खुद्द याचा खुलासा केला आहे. आनंद म्हणाला, ‘माझ्या नाटकावर अजय देवगन चित्रपट तयार करतो आहे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे यात काजोल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे’. आनंदने शिप आॅफ थिसिअससह अनेक लघुपट व नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. तो म्हणाला, ‘अजय सोबत काम करणे हा चांगला अनुभव होता. मला याचा आनंद होतोय की जे नाटक मी काही वर्षांपूर्वी केले होते. त्या नाटकावर आज चित्रपट तयार केला जातोय. यात काजोलचे असणे माझा उत्साह वाढविणारे आहे. यासोबतच मी या चित्रपटासाठी पटकथा लेखन केले आहे’.  आनंद सध्या ‘अ‍ॅन इन्सिग्निफकन्ट मॅन’ या डॉक्युमेंट्रीवर काम करतो आहे. ही डॉक्युमेंट्री आप व अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे. अजय देवगनचा शिवाय हा चित्रपट १०० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करतो आहे. १०० कोटी क्लबमध्ये हा चित्रपट सामील होणार असल्याचे मानले जात आहे. ‘शिवाय’मध्ये अजय देवगनची प्रमुख भूमिका होती. सोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने सांभाळली होती. काजोलने या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी स्वीकारली होती.