Join us  

प्रेग्नेंसीत शूट करणं काजोलला पडलं होतं महागात, मिसकॅरेजला ठरली होती बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 6:41 PM

पहिल्या प्रेग्नेंसीदरम्यान झालेल्या मिसकॅरेजमुळे काजोल पूर्णपणे कोलमडून गेली होती.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिच्या करिअरच्या कारकीर्दीत तिने एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. शाहरूख खानसोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूप भावते. मात्र काजोलचा खऱ्या आयुष्यातील लाइफ पार्टनर अजय देवगण आहे. काजोल आणि अजय देवगणला दोन मुले आहेत. काजोलच्या पहिल्या प्रेग्नेंसीदरम्यान गर्भपात झाला होता.

काजोलने २४ फेब्रुवारी, १९९९ साली अजय देवगणसोबत सात फेरे घेतले होते. लग्नानंतर तिने करण जोहर निर्मित कभी खुशी कभी गम चित्रपटात काम केले. या चित्रपटात काजोलसोबत शाहरूख खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि करीना कपूर हे कलाकार होते. चित्रपटाच्या शूटिंगवेळी काजोलला माहित होते की ती प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंसीदरम्यान काजोलने शूटिंगमधून ब्रेक घेतला नाही आणि मेहनतीने काम करत राहिली.

१४ डिसेंबर, २००१ ला चित्रपट रिलीज झाला. चित्रपट सुपरहिट ठरला. संपूर्ण चित्रपटाची टीम यश साजरा करत होते. जेव्हा चित्रपटातील सर्व कलाकार सेलिब्रेट करत होते तेव्हा काजोल हॉस्पिटलमध्ये दाखल होती. त्यावेळी काजोलचे मिसकॅरेज झाले होते. मिसकॅरेजमुळे काजोल पूर्णपणे कोलमडून गेली होती. अशावेळी तिच्यासोबत अजय देवगण खंबीरपणे उभा राहिला होता. 

मिसकॅरेजनंतर काजोलने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. तिने जेव्हा पहिल्या बाळाला म्हणजेच न्यासाला जन्म दिला तेव्हा तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. काजोलने कित्येक मुलाखतीत सांगितले आहे की मिसकॅरेज कोणत्याही महिलेसाठी सर्वात वाईट काळ असतो.

काजोलने सांगितले होते की, या काळात कुटुंबाची खूप महत्त्वाची भूमिका असते. जितके जास्त प्रेम कुटुंबाकडून मिळते तितकेच लवकरच दुःख विसरण्यासाठी मदत मिळते.

टॅग्स :काजोलअजय देवगण