Join us  

जर शाहरुखचा मुलगा आर्यन न्यासाला घेवून पळून गेला तर ?करणच्या प्रश्नावर काजोलनेही दिले होते भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:25 PM

काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणालाृ मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही.

काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन नसून जुना आहे. कॉफी विथ करण शोमध्ये जेव्हा काजोलने उपस्थिती लावली होती, या शोमध्ये काजोलसह शाहरूख आणि राणी मुखर्जीही होते.  तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी काजोलने दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शआहरूखनने. करणने विचारले, जर  १० वर्षांनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासाला घेवून दोघे पळून गेले तर. तुमची प्रतिक्रिया काय असेल?

तेव्हा काजोलने दिलेल्या उत्तरावच सा-यांच्या नजरा खिळतात. काजोलने स्मार्टली दिलवाले दूल्हा ले जाएंगे। असे उत्तर दिले. काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणालाृ मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही. शाहरुखचेही प्रतिक्रीया ऐकून काजोल आणि राणी दोघेही हसू लागतात. 

 

सिंगापूरमध्ये शिफ्ट होणार काजोल ! 

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये राहते, न्यासाच्या अभ्यासावर कोणाताही परिणाम होऊ नये अशी काजोल आणि अजय देवगनची इच्छा आहे. कोरोनाच्या महामारीमुळे काजोल आणि अजय देवगण न्यासाला सिंगापूरमध्ये एकटे राहू द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता न्यासासोबत सिंगापूरमध्ये काजोल राहणार आहे.

पुढचे काही महिने काजोल न्यासासोबत राहणार आहे. अजय देवगणने सिंगापूरमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केला आहे, जेणेकरुन काजोल आणि न्यासाला राहण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये.काजोल संसारात बिझी असली तरीही चांगली संधी मिळाली तर ती सिनेमातही काम करते. नुकतेच  'तान्हाजी सिनेमात ती झळकली होती.  ज्यामध्ये अजय देवगन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. 

मुंबईत मुलासोबत राहणार अजय देवगण 

अजय देवगण मुलगा युगसोबत मुंबईत राहणार आहे. रिपोर्टनुसार अजय सध्या दोन स्क्रिप्टवर काम करतो आहे. याशिवाय तो आपल्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शनमध्ये बिझी आहे.

कोरोनामुळे अजयचा सिनेमा मैदानची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल. 

 

टॅग्स :काजोलशाहरुख खान