Join us  

काजोलच्या डोक्यात अभिनय सोडण्याचा विचार? म्हणाली, आता 3 तासांचा सिनेमा पाहू शकत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:57 PM

काजोलच्या अ‍ॅक्टिंगवर आजही चाहते फिदा आहेत. याच काजोलने येत्या काळात अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकला तर आश्चर्य वाटायला नको...

ठळक मुद्देमाझं इन्स्टा पेज मी स्वत:च बघते आणि मज्जा घेते,’ असा एक मजेशीर खुलासाही तिने केला.

प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री काजोल (Kajol s). आजही तिच्याअ‍ॅक्टिंगवर चाहते फिदा आहेत. याच काजोलने येत्या काळात अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकला तर आश्चर्य वाटायला नको. होय, कारण अ‍ॅक्टिंगशिवाय काजोलला चित्रपट बनवण्यातही रस आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात काजोल अभिनय सोडून दिग्दर्शनात पदार्पण करू शकते.अलीकडे ‘फिट अप विद द स्टार्स 3’या वूट ओरिजनल शोमध्ये काजोलने स्वत: हा खुलासा केला. मालिनी अग्रवाल होस्ट करत असलेल्या या शोच्या आगामी एपिसोडमध्ये  काजोल दिसणार आहे. उद्या 20 ऑगस्टला हा एपिसोड वूटवर स्ट्रिम होणार आहे.

मालिनी अग्रवालला दिलेल्या मुलाखतीत काजोल भरभरून बोलली. अगदी करिअरपासून तर कुटुंबापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा तिने केला. काजोलला वाचनाचा अतोनात छंद आहे, हेही या मुलाखतीतून समोर आले.

ती म्हणाली, ‘मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. अगदी कॉफीसोबत दिवसभरात मी 2-3 पुस्तकं सहज वाचू शकते. मी हे करू शकते कारण मला वाचन मनापासून आवडतं. आता मी सिनेमे पाहू शकत नाही. 3 तासांचा सिनेमा पाहू शकेल, इतका संयम आता माझ्यात उरलेला नाही. हो, पण चित्रपटगृहात जाऊन मी बघू शकेल.’ ‘आता मला अ‍ॅक्टिंगशिवाय सिनेमे बनवायलाही आवडतात. मी खूप फूडी आहे. पीनट बटर माझा जीव की प्राण आहे,’ असेही ती म्हणाली.‘माझं स्वत:च इन्स्टाग्राम पेज मला फार फनी वाटतं. कारण माझा सेन्स ऑफ ह्युमर फक्त मलाच कळतो. मी जे बोलते, करते, ते 90 टक्के लोकांना कळतंच नाही, असं मला वाटतं. त्यामुळे माझं इन्स्टा पेज मी स्वत:च बघते आणि मज्जा घेते,’ असा एक मजेशीर खुलासाही तिने केला.

  

टॅग्स :काजोल