Join us  

काजोलने पहिल्यांदाच व्यक्त केले तिच्या आयुष्यातील हे दुःख, वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 7:00 PM

काजोलने ह्युमन ऑन बॉम्बे या इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे.

ठळक मुद्देकभी खुशी कभी गम या चित्रपटाच्यावेळी माझा गर्भपात झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. पण मी रुग्णालयात होते. त्यानंतर काही महिन्यांनी माझा पुन्हा एकदा गर्भपात झाला. या सगळ्याचा मला धक्का बसला होता.

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन अजय आणि काजोलने केले. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने त्या दोघांच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गुपितं सांगितली.

काजोलने ह्युमन ऑन बॉम्बे या इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी आणि अजय २५ वर्षांपूर्वी हलचल या चित्रपटाच्या सेटवर पोहोचलो. चित्रपटाच्या सेटवर मी तयार होऊन बसले होते. या चित्रपटातील माझा नायक कोण असे विचारले असता एका व्यक्तीने अजयकडे बोट दाखवले. तो एका कॉर्नरमध्ये बसला होता. त्याला भेटण्याच्या १० मिनिटे आधीपर्यंत मी त्याच्याविषयी केवळ वाईट गोष्टीच बोलत होती. 

या मुलाखतीत तिने पुढे सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स बनलो. त्या वेळात आम्ही दोघेही दुसऱ्या व्यक्तींच्या प्रेमात होतो. मी माझ्या बॉयफ्रेंडच्या तक्रारी अजयकडे करायचे. पण लवकरच आमचे ब्रेकअप झाले. त्या दरम्यान माझी आणि अजयची मैत्री घट्ट झाली होती. आम्ही दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही. चार वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या लग्नाबाबत ऐकल्यावर अजयच्या घरातील सगळेच खूश झाले. पण माझे वडील ही गोष्ट कळल्यांतर माझ्याशी चार दिवस तरी बोलले नव्हते. मी लग्न न करता करियरवर लक्ष केंद्रित करावे असे त्यांना वाटत होते. पण मी माझा निर्णय घेतला होता.

लग्नाच्या दिवसाविषयी काजोलने सांगितले की, लग्न अतिशय साधेपणाने व्हावे असे आम्हाला वाटत असल्याने आम्ही मीडियाला लग्नाचे ठिकाण चुकीचे सांगितले. आम्ही घरातच लग्न केले आणि लग्नानंतर आम्ही सिडनी, हवाई, लॉस एन्जेलिस येथे हनिमूनला गेलो. पण तिथे अजय आजारी पडला. त्यामुळे पुढच्या ठिकाणांवर न जाता आम्ही परतलो. कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्यावेळेची एक गोष्ट मी आयुष्यात विसरू शकत नाही. या चित्रपटाच्यावेळी माझा गर्भपात झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. पण मी रुग्णालयात होते. त्यानंतर काही महिन्यांनी माझा पुन्हा एकदा गर्भपात झाला. या सगळ्याचा मला धक्का बसला होता. मी कोणत्या दुःखातून जात होती हे मी सांगू देखील शकत नाही. पण काही वर्षानंतर निसा आणि त्यानंतर युगचा जन्म झाला. 

टॅग्स :काजोलअजय देवगणतानाजी