Join us  

काजोल आणि अजय देवगणचा हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल, ते दोघे आहेत परफेक्ट कपल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:49 PM

काजोलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो अजय आणि तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देकाजोलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत काजोल, अजय, न्यासा आणि युग यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून ते दोघेही त्यांचा हॉलिडे एन्जॉय करत असल्याचे लक्षात येत आहे.

काजोल आणि अजय देवगण यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हटले जाते. त्या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाले असून त्यांना दोन मुले देखील आहेत. काजोल आणि अजय देवगण अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावतात. तसेच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ते दोघे त्यांच्या कामात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते दोघे त्यांच्या कुटुंबियांसाठी नेहमीच वेळ काढतात. ते दोघे सध्या आपल्या मुलांना घेऊन फिरायला गेले आहेत. काजोलनेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. 

काजोलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत काजोल, अजय, न्यासा आणि युग यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून ते दोघेही त्यांचा हॉलिडे एन्जॉय करत असल्याचे लक्षात येत आहे. काजोलने देखील कॅप्शनमध्ये ते चौघे रोड ट्रीप एन्जॉय करत असल्याचे म्हटले आहे. काजोलने शेअर केलेल्या या फोटोत अजय आणि काजोल दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे घातले असून ते दोघेही या फोटोत खूपच क्यूट दिसत आहेत. 

अजय देवगणचा दे दे प्यार दे हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या अजय आणि काजोल त्यांच्या तानाजीः द अन्संग हिरो या चित्रपटावर काम करत असून त्यांच्यासोबतच सैफ अली खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर काजोल आणि अजय या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत सध्या काजोल आणि अजय आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहेत.  

टॅग्स :काजोलअजय देवगण