Join us  

म्हणे, ही इतकी गोरी कशी झाली? काजोलच्या लेकीचे फोटो पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 3:30 PM

मेकअप पाहून नेटक-यांनी दिल्या अशा Comments

ठळक मुद्देयाआधीही न्यासाला अनेकदा ट्रोल झाली आहे.

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत न्यासा पिवळ्या रंगाच्या लहंग्यात अतिशय सुुंदर दिसतेय. पण यात तिने हेवी मेकअप केलेला आहे. न्यासाचे फोटो समोर आलेत आणि न्यासा ट्रोल झाली. न्यासाने या फोटोत सुंदर पिवळ्या रंगांचा गाऊन घातला आहे. त्यात तिचा क्युट अंदाज लोकांना भावेल असाच आहे. मात्र ट्रोलर्सला तिचा मेकअप खटकला. ‘ही इतकी सुंदर कशी दिसतेय?’ असा सवाल एका युजरने केला.

तर अन्य एकाने ‘हिचा रंग इतका कसा उजळला?’ असा प्रश्न केला. काहींनी या फोटोवरून न्यासाने सर्जरी केल्याचा शोध लावला. ‘अचानक ही इतकी सुंदर कशी झाली. नक्कीच कॉस्मेटिक सर्जरी केली असावी’, असे एका युजरने लिहिले.

याआधीही न्यासा अनेकदा ट्रोल झाली आहे. मध्यंतरी या ट्रोलिंगवरून अजय देवगण चांगलाच भडकला होता. ‘तुम्ही मला जज करा, काजोलला जज करा. पण माझ्या मुलांना अजिबात जज करू नका. काजोल आणि मी कलाकार आहोत. आमच्या कामावरून तुम्ही आम्हाला जज करू शकता. आमची मुले आमच्यामुळे चर्चेत येतात.

त्यांना विनाकारण जज करणे योग्य नाही. मी सुद्धा असाच जजमेंटल होऊन तुमच्याबद्दल बोललो तर नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल. माझ्या मुलांबद्दलही असेच आहे, असे अजय म्हणाला होत. त्याआधीही  न्यासाला ट्रोल करणा-यांवर अजय बिथरला होता. अर्थात याऊपरही न्यासाला ट्रोल करणारे थांबले नाहीत.

टॅग्स :काजोलअजय देवगण