Join us  

अभिनेत्री काजल अग्रवाल 'या' आजारामुळे झाली होती हैराण, तिने इन्स्टाग्रामवर व्यक्त केलं दुःख...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 4:18 PM

सोशल मीडियावर तिने तिच्या आजाराविषयी खुलासा केला आहे.

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.  ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित  गोष्टी चाहत्यांसह शेअर करते असते. अलीकडेच 'सिंघम' अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या नवा फोटो शेअर केले आहे, ज्यात तिने तिच्या एका आजाराविषयी खुलासा केला आहे. 

अभिनेत्रीने सांगितले इनहेलरचं महत्त्वएका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काजलने दमापासून मुक्त होण्यासाठी इनहेलरचे महत्व समजावण्याचा प्रयत्न केला आहे. इनहेलर किती महत्त्वाचे आहेत आणि दम्यामध्ये डेअरी प्रोडक्ट आणि चॉकलेटपासून दूर कसे रहाल याविषयी अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले आहे. काजल लिहिते, "खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी इनहेलरच्या वापरल्याबद्दल लाज वाटण्याचे काहीच नाही."

आजारामुळे केला या अडचणींचा सामना काजलने सांगितले, “जेव्हा मला स्वत: मध्ये ब्रोन्कियल दम्याचे निदान झाले तेव्हा मला आठवते की माझ्या आवडीच्या गोष्टी खाण्याचे बंद केलं गेलं. कल्पना करा की मुलाला डेअरी प्रोडेक्ट आणि चॉकलेटपासून दूर ठेवणं किती कठीण गेले असेल. हे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी मोठी झाल्यावर मला गोष्टी समजण्यास सुरवात झाली.  त्यादरम्यान मी जेव्हा कोठेही ट्रिपला जायचे तेव्हा मला बर्‍याचदा थंडी, धूळ, आणि धूर या गोष्टींचा सामना करावा लागायचा आणि यामुळे मला खूप त्रास व्हायचा. "

काजल पुढे लिहिते की, प्रवासादरम्यान धूळ, धूर आणि प्रचंड सर्दी यासारख्या गोष्टींचा सामना करण्यासाठी मी माझ्यजवळ इनहेलर ठेवण्यास सुरवात केली. जेव्हा मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा तेव्हा मी इनहेलर वापरायची. काजल म्हणाली, "तुम्हाला याचा वापर करायला लाज वाटू नये, तर जे लोक या समस्येला तोंड देत असतात त्यांना याचा उपयोग करण्याविषयी जागरूक केले पाहिजे.  #SayYesToIhahalers आणि माझे मित्र, चाहते आणि कुटुंबियांना मी अपील करते की आपण सर्वजण इनहेलर्सबद्दल लोकांना सांगा असे तिने यात लिहिले आहे.  

टॅग्स :काजल अग्रवाल