Join us  

स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 4:40 PM

तिचा बर्थ डे यावर्षी दुबईमध्ये सेलिब्रेट केला होता. त्यावेळी सेलिब्रेशनचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते.

अभिनेत्री काजल अग्रवाल ब-याच दिवसानंतर चर्चेत आली आहे. ते ही तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमुळे. काजलने स्विमिंग पुलमधील काही फोटो सोशळ मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर होता खूप मोठ्या प्रमाणात व्हायल होत आहेत.काजलने हे खास फोटोशूट करून घेतले आहे.

 

व्हाइट कलरचा कटआउट ड्रेसमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. यावेळी ती खूपच स्टनिंग दिसत आहे. काजलने तिचा बर्थ डे यावर्षी दुबईमध्ये सेलिब्रेट केला होता. त्यावेळी सेलिब्रेशनचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते.

तिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तेलगू  सीत सिनेमात ती झळकली होती. मात्र या सिनेमाला पाहिजे तसे यश मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये  'क्यू! हो गया ना' सिनेमातून ती एंट्री केली होती. सिनेमात सपोर्टींग रोलमध्ये ती झळकली होती. मात्र 'सिंघम' आणि 'स्पेशल 26'  सिनेमात ती झळकली मात्र 'सिंघम' सिनेमाने  तिला खरी लोकप्रियता मिळून दिली होती. सिनेमातील तिच्या भूमिकेला रसिकांनी प्रचंड पसंती दिली होती. अजय देवगण आणि काजल अग्रवाल ही जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. तर 'स्पेशल 26' मध्ये अक्षय कुमारसह ती झळकली होती. 

काजल बॉलिवूड सिनेमा क्वीनचा तमीळ रिमेक पेरिस पेरिसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश अरविंद करत आहेत. काजल ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिने विनामेकअप फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिने म्हटले होते की, आत्ममुग्धता सगळीकडे आहे. त्या पंक्तीत आपण स्वतःमध्ये व गर्दीत सामील होण्याचा प्रयत्न करत असतो.

मेकअप फक्त बाहेरील सौंदर्याला सुंदर बनवते. ते आपल्याला व्यक्ती म्हणून ओळख देतो का? किती योग्य म्हटले आहे की आपण किती चांगले आहोत, असा स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे.

टॅग्स :काजल अग्रवाल