Join us  

अमिताभ बच्चन यांना 'सर जी' न बोलल्यामुळे मिळाली होती कादर खान यांना शिक्षा, सिनेमातून मिळाला होता डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:41 PM

कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने इंडस्ट्रीत मोठी धमाल उडविली होती.

'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम, दीनानाथ चौहान, मां का नाम, सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल...' असे अनेक दमदार संवाद लिहिणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान इंडस्ट्रीतील अष्टपैलू व्यक्तिंपैकी एक होते. आपल्या अभिनयाने त्यांनी इंडस्ट्रीला एक वेगळी ओळख दिली होती. ते केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते तर एक उत्कृष्ट विनोदकार, पटकथा लेखक आणि संवाद लेखक देखील होते. आजही त्यांचे संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. अनेक चित्रपटांच्या यशामागे कादर खान यांचे दमदार संवादची महत्त्वाची भूमिका होती.

कादर खान म्हणाले होते की, एका दाक्षिणात्य निर्मात्याने त्यांना अमिताभ बच्चन यांना सरजी बोलण्याचा सल्ला दिला होता. पण ते तयार झाले नाहीत. कारण ते नेहमीच त्यांना प्रेमाने अमित असे संबोधायचे. जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा सल्ला ऐकला नाही तर त्यांना चित्रपटातून डच्चू देण्यात आला. याच कारणामुळे खुदा गवाह चित्रपट हातातून निघून गेला. त्यामुळे कादर खान व अमिताभ बच्चन यांचे संबंध खराब झाले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. त्यानंतर तो व्हि़डीओ डिलीट करण्यात आला. 

कादर खान यांचे म्हणणे होते की जेव्हापासून अमिताभ बच्चन यांनी राजकारणात पाऊल टाकले तेव्हापासून जवळपास आमच्या नात्यात कटूता आली. ते म्हणाले की, जेव्हा ते खासदार बनून दिल्लीला गेले तेव्हा मी खूश नव्हतो. कारण राजकारणात माणूस गेला की तो बदलून जातो. जेव्हा ते परत आले तेव्हा ते माझेवाले अमिताभ बच्चन नव्हते. मला या गोष्टीचा खूप वाईट वाटले. 

टॅग्स :कादर खानअमिताभ बच्चन