Join us  

इतक्या बोल्ड फोटोशूटची खरंच गरज होती का? ‘न्यूड’ फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 11:33 AM

वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट केले आणि अचानक ती चर्चेत आली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ शाहिदच्या मोलकरणीची ही भूमिका वनिता खरातने साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात आहे.

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ झाला. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.  पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूरला कधी नव्हे इतके टीकेचा धनी व्हावे लागले होते.  या चित्रपटातील चित्रपटामध्ये एका सीनवरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. या सीनची कधी नव्हे इतकी चर्चा झाली होती. शाहिदच्या मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा हा सीन होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती, तर तीच अलीकडे न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेली वनिता खरात.

वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट केले आणि अचानक ती चर्चेत आली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुळात याची गरजच काय? असा प्रश्न अनेकांना साहजिकच पडला. तर गरज होती. या न्यूड फोटोशूटमागे वनिताचा विशिष्ट हेतू होता. हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, त्यामागे एक खंबीर भूमिका होती.टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वनिताने या फोटोशूटमागची सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

 

काय म्हणाली वनिता?ती सांगते, वाढलेल्या वजनावरून स्वत:ला कमी लेखणारे अनेकजण आपल्या अवतीभवती आहोत. वजन जास्त म्हणजे, आपण सुंदर नाहीत, अशी पक्की समजून झालेले आणि यामुळे अस्वस्थ असलेले अनेकजण आहेत. अगदी पुरूष मंडळीही याला अपवाद नाही. महिलांबद्दल तर बोलायलाच नको. बायकांची संख्या आणखीच जास्त आहे. मला याच भावनेला छेद द्यायचा होता. तुमचे वजन, तुमचा रंग, तुमचे आकारमान यावरून सौंदर्य जोखले जाऊच शकत नाही. आपण सगळेच सुंदर आहोत, हा इतका साधा सुधा विचार स्वत:सह समाजात रूजवणे हाच माझा हेतू आहे. आता यासाठी न्यूड फोटोशूटच का? असा प्रश्नही लोक करतील. तर त्यात वाईट काय? असा माझा उलट प्रश्न आहे. जन्मत: आपण सगळे नग्नच असतो मग नग्नतेला अश्लील का मानायचे?

 इंडस्ट्रीत वाढलेल्या वजनामुळे भेदभाव, हेटाळणी सहन करावी लागली का? असे विचारले असता यावरही ती बोलली. ती म्हणाली, इतरांबद्दल मला माहित नाही. पण माझ्याबद्दल सांगायचे तर मला सतत आई, काकू, मोलकरणीच्याच भूमिकांसाठी विचारले जाते. माझ्या मते, ही इंडस्ट्रीची समस्याच आहे. मात्र बॉडी पॉझिटिव्हीटी चळवळ आणि फिल्म इंडस्ट्रीच्या मर्यादा यांची सरमिसळ व्हायला नको.

कबीर सिंग’ शाहिदच्या मोलकरणीची ही भूमिका वनिता खरातने साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात आहे. रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे.  या सीनवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.  वनिताची एक मैत्रिण मुकेश छाब्रांच्या ऑफिसात काम करत होती. मुकेश छाब्रांना यासाठी एक नवा चेहरा होता. मैत्रिणीने वनिताची नाव सुचवले आणि तिला ऑडिशनसाठी बोलवले गेले. ऑडिशनमध्ये वनिता पास झाली आणि तिला ही भूमिका मिळाली.

 

 

टॅग्स :कबीर सिंग