Join us

कबीर खान घेणार ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:57 IST

कबीर खान घेणार ब्रेकबॉ लीवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेले दिग्दर्शक कबीर खान आता काही काळासाठी ब्रेक ...

कबीर खान घेणार ब्रेकबॉ लीवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेले दिग्दर्शक कबीर खान आता काही काळासाठी ब्रेक घेऊ इच्छितात. 'बजरंगी भाईजान', 'फँटम' यांसारखे हिट चित्रपट देणारे कबीर खान म्हणाले की, ते मागच्या अडीच वर्षांपासून सतत काम करत आहेत. यादरम्यान, त्यांनी एकदाही ब्रेक घेतला नाही. सतत काम केल्यानंतर एखादा मोठा ब्रेक घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी प्रोजेक्ट्स बाबत माहिती देताना ते म्हणाले, 'मी स्वत: एक कथा लिहीत असून या व्यतिरीक्त माझ्याकडे काही आयडीया आहेत. त्याच्यावर काम केल्यानंतर पुढच्या चित्रपटासाठीचा विषय मी निश्‍चित करेल.' कबीरजींच्या चाहत्यांना आता काही काळ तरी वाट पाहावी लागणार हे नक्की!