Join us  

तिचे तिन्ही प्रियकर तिच्या अंतिम यात्रेला हजर होते...! कबीर बेदीने सांगितली दु:खद कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 2:33 PM

एका ताज्या मुलाखतीत Kabir Bedi परवीन बाबीबद्दल बोलला. एकटा असताना मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझे प्रेम आठवते, असे तो या मुलाखतीत म्हणाला.

ठळक मुद्देकबीर बेदी एकेकाळी परवीन बाबीसोबत नात्यात होता. यावर त्याने आत्मचरित्रात लिहिले आहे.

‘स्टोरीज आई मस्ट टेल’  (Stories I Must Tell: An Actor's Emotional Journey)  हे अभिनेता कबीर बेदीचे (Kabir Bedi) आत्मचरित्र येत्या 19 तारखेला प्रकाशित होतेय. पण त्यापूर्वीच या पुस्तकाची जोरदार चर्चा आहे. आपल्या या आत्मचरित्रात कबीर बेदीने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अभिनेत्री परवीन बाबीसोबतचे (Parveen Babi)  रिलेशन, या रिलेशनशिपचा अंत आणि परवीनचा आजार याबद्दलही कबीर बेदीने या आत्मचरित्रात अनेक खुलासे केले आहेत. या पार्श्वभूमीवर एका ताज्या मुलाखतीतही कबीर परवीन बाबीबद्दल बोलला.एकटा असताना मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझे प्रेम आठवते, असे तो या मुलाखतीत म्हणाला.

तो पुढे म्हणाला, ‘परवीन मानसिक आजारीशी लढतेय, मला हे फिल होते. पण तिने मला सोडले, याचा राग अधूनमधून अनावर व्हायचा. परवीनमुळे मी खूप काही भोगले होते. अर्थात तिची चुक नव्हतीच. कदाचित मी सुद्धा तेवढाच दोषी होतो. परवीनसारखी महिला आयुष्यात आहे, असे म्हणून लोक माझा हेवा करायचे. पण परवीनसोबतचे ते नाते कसे होते, हे माझे मलाच ठाऊक होते.’ 2005 मध्ये अचानक एकेदिवशी मला परवीनच्या निधनाची बातमी मिळाली. तिचा मृतदेह जुहूच्या तिच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. 70 व 80 च्या दशकातील एका मेगास्टारचा इतका दुर्दैवी अंत व्हावा, हे पाहून मनाला वेदना झाल्या होत्या. तिच्या निधनानंतर  तिचे तीनही प्रियकर तिच्या अंत्यसंस्काराला हजर होते. महेश भट्ट, डॅनी डेन्जोंपा आणि मी आम्ही तिघेही कब्रिस्तानमध्ये पोहचलो होतो आणि तिच्या दफनविधीठी  मदत केली होती.

परवीन बाबीसोबतचे नाते...कबीर बेदी एकेकाळी परवीन बाबीसोबत नात्यात होता. यावरही त्याने आत्मचरित्रात लिहिले आहे. तो लिहितो,  परवीनला केवळ डॅनी डेंजोग्पाची गर्लफ्रेन्ड म्हणूनच मी ओळखत होतो. डॅनी हँडसम होता. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आणि परवीनपेक्षा एका वर्षाने मोठा होता. परवीन व डॅनी खुल्लमखुल्ला एकत्र राहू लागले होते. परवीनला लोक भलेही मॉडर्न मानत. पण मी पारंपरिक विचारांची महिला होती. जुहूची गँग ओशोच्या विचारांनी भारावून ‘फ्री सेक्स’बद्दल बोलत असताना परवीन मात्र या संबंधातही प्रामाणिकपणा असावा, या मताची होती. त्यावेळी मला हेच हवे होते. तिच्या याच विचारांवर मी भाळलो होतो आणि तिच्या प्रेमात पडलो होतो. एकदिवस प्रोतिमा  घरी आली मी तिला थेट आज रात्री मी परवीनकडे जाणार असल्याचे सांगितले. आजची रात्रच नाही तर प्रत्येक रात्र मी तिच्यासोबत राहू इच्छितो, असे मी तिला स्पष्टपणे सांगितले. हे ऐकून प्रोतिमा  रडू लागली आणि मी तिथून निघून गेलो आणि प्रोतिमासोबतचे माझे ओपन मॅरेज संपुष्टात आले. 

पहिल्यांदा स्टारडस्टमध्ये परवीन बाबीच्या मानसिक आजाराबद्दल छापून आले. तिच्या आजारासाठी मला जबाबदार ठरवले गेले. मी तिला सोडले म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेली, असे काय काय चर्चा सुरु झाल्यात.पण प्रत्यक्षात मी नाही तर परवीन मला सोडून गेली होती. मी तिची मदत करण्यास तयार होतो पण तिने त्यासाठीही नकार दिला होता, असेही कबीर बेदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

टॅग्स :कबीर बेदीपरवीन बाबी